Skip to main content

शासकीय योजनांमध्ये रेशनकार्डचे महत्त्व अधोरेखित: नगरसेविका सौ सुषमा रवी पगारे

नाशिकरोड| प्रतिनिधी| अन्न सुरक्षा योजना व इतर महत्त्वाच्या योजनेमध्ये लाभार्थ्यांना यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी रेशनकार्डला अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. शासनाकडून लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी-सवलतीसाठी रेशनकार्डचे महत्त्व अधोरेखित झाले आहे, असे प्रतिपादन प्रभाग १६ च्या नगरसेविका सौ. सुषमा रवि पगारे यांनी केले.
Importance-of-ration-card-underlined-in-government-schemes-Corporator-Mrs-Sushma-Ravi-Pagare
उपनगरमध्ये मातोश्रीनगर येथे युगांतर संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रेशनकार्ड वाटप करण्यात आले. पक्षातर्फे माहे फेब्रुवारी महिन्यात उपनगर मध्ये रेशनकार्ड शिबिर घेण्यात आले होते. त्यात नवीन रेशनकार्ड नोंदणी आणि जुन्या रेशनकार्डात काही दुरुस्ती करणे, याकामासाठी नागरिकांनी नोंदणी केली होती. त्यादुरुस्ती झालेल्या रेशनकार्डचे वाटप करण्यात आले. राज्याचे अन्न-धान्य नागरी पुरवठा मंत्री तसेच पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली माहे फेब्रुवारी महिन्यात रेशनकार्ड शिबिर राबविण्यात आले होते. शिबिरात ज्या नागरिकांनी नवीन रेशनकार्डसाठी नोंदणी केली होती, त्यांच्या कार्डचे लवकरच वाटप केले जाईल, असेही सौ पगारे म्हणाल्या. सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळून कार्यक्रम झाला. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून रेशनकार्ड वाटप करण्यात आले. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेस नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. 

यावेळी शंकर रामचंद्रन, दीना दगुजी कदम, पुंडलिक वामन क्षिरसागर, राधेश्याम ज्ञानीराम नाथेकर, मनीषा प्रदीप इंगळे, जीवन कमलाकर दाणी, सचिन अच्युतराव घोडके, प्रदीप चंद्रकांत अहिरे, तिलबहादूर काली खत्री, निलेश देवराम बदादे, पल्लवी श्रीकांत गीते, काशिनाथ शिवराम पाटील, सिंधू हिरामण दुसाने, शिवाजी गोविंद भालके, पंढरीनाथ वामनराव पाटील, राजेश सर्वेश्वर चमोली, स्वाती रोहित भालेराव, जगन्नाथ महादेव गवळी, हेमलता रमेश कामत, रविंद्र अण्णाजी अल्हाट, स्वप्निल रुपचंद्र चौधरी, रमाकांत संभाजी सोनवणे, राजेश सुधाकर अहिरे, अश्विनी अमित गुरव, मनेश मोतीलाल सरकार, मिलन कांती दास, कय्युम शेख, उत्तम निवृत्ती बोराडे, श्वेता नंदकुमार भराडे, लंका मधुकर चहाने, राजू रुपाजी कटारे, शशिकांत जॉन वाघमारे, पुरुषोत्तम विठ्ठल शहाणे, दिनकर लक्ष्मण ढाके या नागरिकांना रेशनकार्ड वाटप करण्यात आले. याप्रसंगी *युगांतर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवी पगारे (सर), कुणाल पगारे, मंगला चव्हाण, कीर्ती सुर्यवंशी आदी उपस्थित होते. 

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...