Skip to main content

माजी आ. गणपतराव देशमुख यांचे निधन

मुंबई| सोलापूरमधील सांगोला विधानसभेचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचने निधन झाले आहे. सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये वयाच्या 94 व्या वर्षी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गणपतराव देशमुख हे तब्बल 11 वेळा आमदार होते. त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव होता. त्यांच्या निधनामुळे राजकीय विश्वावर शोककळा पसरली आहे.
Ex-mla-Ganapatrao-Deshmukh-passed-away


गणपतराव यांनी तब्बल 54 वर्ष सांगोला विधानसभा मतदार संघांच प्रतिनिधित्व केले. एकाच मतदारसंघातून 11 वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम देशमुख यांनी केला. गणपतराव यांच्या निधनाने राज्यातील राजकारणातला ध्रुवतारा हरपल्याची भावना जनसामांन्यातून व्यक्त केली जात आहे.

त्यांची सामािजक, राजकीयक कारकीर्द मोठी होती्र ते 1950-54 शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत विद्यार्थी सभेचा कार्यकर्ता होते. पुढे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सहभाग व अनेक वेळेस कारावासही भोगला आहे. 1962- पासुन शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती व चिटणीस मंडळाचे सदस्य होते. 1965- अन्नधान्य चळवळीत येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते.  1969-1975 महाराष्ट्र राज्य शेतकरी सभेचे सरचिटणीस  होते.  1969 संस्थापक अध्यक्ष,  सांगोले तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, या संस्थेचे सांगोले येथे न्यु इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज आणि विज्ञान महाविद्यालय सांगोला तर 1972-75  महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक मंडळ मुंबईचे सदस्य होते. देशमुख् यांनी 1975 आणीबाणीच्या काळात खटला आणि तुरूंगवास भोगला आहे. आटपाडी येथील माण गंगा सहकारी साखर कारखाना व सांगोला तालुक्यातील सांगोले तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत सक्रिय सहभाग होता.

सांगोले शाखा पाटबंधारे प्रकल्प क्रमाक्र  4  व 5 ,टेंभू व म्हैसाळ प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासाठी तसेच कृष्णा खोरे महामंडळाचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील हाेते. रोजगार हमी योजनेखाली बोर, डाळिंब व अन्य फळबागांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यासाठी व विक्रीसाठी सहकारी फळबाग उत्पादक शेतकरी संघ स्थापन करून देशात व परदेशात फळ विक्री ची व्यवस्था करण्यात त्यांचा पुढाकार होता.

महाराष्ट्र विधानसभा सदस्य 1962-67, 1967-72, 1974-78, 1978-80, 1980-85, 1985-90, 1990-95, 1999-2004, 2004-2009, 2009-2014,  2014  ते 2019  सदस्य होते.   2014  साली  निवडून येवून जागतिक रेकॉर्ड केले. विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र राज्य विधानसभा--1977, पुलोद शासन-- जुलै 1978 ते फेब्रुवारी 1980 पर्यंत कृषी,  ग्रामविकास आणि विधी व न्याय खात्याचे मंत्री, पुरोगामी लोकशाही आघाडी शासन --19 ऑक्टोबर 1999 ते मे 2002 पर्यंत पणन , रोजगार हमी योजना मंञी,  मे  2002 मध्ये मंत्री पदाचा राजीनामा दिला, विधान सभेचे हंगामी अध्यक्ष - मार्च 1990 , नोव्हेंबर 2004, आणि पुन्हा तिसर्‍या वेळेस 9 नोव्हेंबर 2009 रोजी महाराष्ट्राचे राज्यपालांकडून हंगामी अध्यक्ष म्हणून निवड, शासकीय समिती सदस्य-- 1980-82 महाराष्ट्र विधान मंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष. विधान मंडळाच्या अंदाज,  लोकलेखा, कामकाज सल्लागार, उप. विधान, सार्वजनिक उपक्रम व विनंती अर्ज इत्यादी समित्यांचे सदस्य होते.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...