Skip to main content

जेईई मेन-सत्र ३: महाराष्ट्रातील अतिवृष्टीचा फटका बसलेल्या विदयार्थ्यांना परीक्षेसाठी आणखी एक संधी

मुंबई| महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे जे विद्यार्थी 25 आणि 27 जुलै रोजी होणारी जेईई परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांना ही परीक्षा देण्याची आणखी एक संधी दिली जाईल, अशी घोषणा राष्ट्रीय चाचणी यंत्रणा- एनटीए ने केली आहे. नव्या तारखा लवकरच घोषित केल्या जातील.
JEE-Main-Session-3-Another-chance-for-students-who-have-been-hit-by-heavy-rains-in-Maharashtra

कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा या सात शहरांमध्ये  ज्या उमेदवारांची परीक्षा केंद्रे आहेत, आणि जे  विद्यार्थी तिसऱ्या टप्प्यातल्या परीक्षेसाठी 25 आणि 27 जुलै रोजी पावसामुळे केंद्रांवर जाऊ शकत नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांना आणखी एकदा ही परीक्षा देण्याची संधी दिली जाईल.


महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याच्या घटनांच्या पार्श्व भूमीवर, कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी,रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा या सात शहरांमध्ये  ज्या उमेदवारांची परीक्षा केंद्रे आहेत, आणि जे  विद्यार्थी तिसऱ्या टप्प्यातल्या परीक्षेसाठी या केंद्रांवर जाऊ शकत नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याची सूचना एनटीए- म्हणजेच राष्ट्रीय चाचणी यंत्रणेला दिली आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज ट्विटर वरुन दिली.

या शहरांमध्ये ज्यांची परीक्षा केंद्रे आहेत, असे विद्यार्थी सद्य परिस्थितीत कदाचित उद्या म्हणजेच 25 आणि 27 जुलैला होणाऱ्या परीक्षांसाठी जाऊ शकणार नाहीत, मात्र म्हणून त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.त्यांना परीक्षेसाठी पुन्हा एक संधी दिली जाईल आणि या पर्यायी तारखा एनटीए लवकरच जाहीर करेल,असे प्रधान यांनी म्हटले आहे.

जेईई मेन परीक्षेच्या तिसऱ्या सत्रातील परीक्षा  देशभरात, 20,22 ,25 आणि 27 जुलै रोजी नियोजित केल्या आहेत.  देशातल्या आणि परदेशातील 334 शहरांमध्ये या परीक्षा होत आहेत. एनटीए ने याआधी 20 आणि 22 जुलै रोजी दोन परीक्षा घेतल्या आहेत.

या सर्व परीक्षार्थींना एनटीएच्या  (www.nta.ac.in) संकेतस्थळाकडे (jeemain.nta.nic.in) लक्ष देत राहावे, त्यावर त्यांना परीक्षेविषयीची ताजी माहिती मिळू शकेल, असा सल्लाही त्यांना देण्यात आला आहे.


सविस्तर माहिती आणि स्पष्टीकरणासाठी JEE (Main) - 2021 चे परीक्षार्थी 011-40759000 या क्रमांकावर अथवा  jeemain@nta.ac.in या ईमेलवर संपर्क साधू  शकतात.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...