नाशिकरोड| प्रतिनिधी| अभिनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा. डॉ. अमोल कोल्हे हे नाशिक येथे कार्यक्रमा निमित्त आले असता राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या शहर कार्याध्यक्षा तथा नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे यांनी त्यांची भेट घेऊन भारताची संविधान उद्देशिका भेट म्हणून दिली. या भेटीचा त्यांनी सहर्ष स्वीकार करून सौ. पगारे यांच्या कामाचे विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी खा. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर महिला कार्याध्यक्षा तथा नगरसेविका म्हणून पार पाड़त असलेल्या कामांची माहिती सौ सुषमा रवी पगारे यांच्या कडून जाणून घेतली. पक्षाच्यावतीने नागरिकांच्या भल्यासाठी शहरात राबविन्यात येत असलेल्या विविध आंदोलनात तथा कार्यक्रमात सक्रिय सहभाग आणि नगरसेविका या नात्याने प्रभाग १६ मध्ये घेत असलेल्या विविध समाजपयोगी उपक्रमांची माहिती जाणून घेतली. प्रभाग १६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने घेण्यात आलेले रेशनकार्ड शिबिर व इतर जनजागृतीपर कार्याची विशेष प्रशंसा केली.
त्यात मुख्य म्हणजे कोरोना काळात प्रभागातील जे वयोवृद्ध नागरिक, महिला, तरुण या संसर्गजन्य आजाराला बळी पडून मृत्युमुखी पडले, त्यांच्या स्मरणार्थ 'वृक्षारोपण' याउपक्रमांचे विशेष कौतुक करून त्यांच्या कार्याची दाद दिली. जे नागरिक या संसर्गजन्य आजाराला बळी पडले, त्यांच्या नातेवाईक यांचे अश्रु पुसून व मृत्युमुखी पडलेल्यांच्या आठवणी चिरंतन जागृत राहव्या यासाठी त्यांच्या नावाने वृक्ष लावून त्याचे संगोपन करणे, हा उपक्रम त्यांच्या मनाला विशेष भावला, असा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त करून सौ. सुषमा रवी पगारे यांच्या भावी वाटचालीस अनंत शुभेच्छा दिल्या. यावेळी युगांतर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवी पगारे (सर) उपस्थित होते.
