Skip to main content

तात्पुरती नाही तर शक्य ती मदत कायमस्वरूपी करावी लागेल: देवेंद्र फडणवीस

सातारा| हे मोठे नुकसान असून सर्वांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. नव्याने घरे बांधून त्यांना जागा द्यावी लागेल. अशा घटनांच्या वेळी मिळणारी मदत तोकडीच असते. पण त्यांना वाढीव मदत मिळणे अपेक्षित आहे. तात्पुरती नाही तर शक्य ती मदत कायमस्वरूपी करावी लागेल. आणि सरकार म्हणून जनतेच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे असे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस यांनी सांगितले. पूर पाहणी दौऱ्यानंतर ते माध्यमासोबत बोलत होते.
निर्सगाचा फटका सातारा जिल्ह्याला मोठ्या प्रमाणांत बसला आहे. हजारो संसार उध्दवस्त झाले आहेत. हजोरा कुटुंबिय बेघर झाले आहेत. पुरग्रस्तांनी आपल्या कुटुंबातील आप्त गमाविले आहेत. पुरग्रस्तांचे सांत्वन करुन त्यांना या निर्सगाच्या संकटातून बाहेर काढून त्यांना धीर देण्यासाठी आज विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सातारा येथे भेट दिली. त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना जीवनाश्यक वस्तूंची तातडीने मदत मिळवून दिली. निसर्गाच्या सकंटामुळे स्थलांतरीत झालेल्यांच्या वेदना समजावून घेतल्या. सरकार दरबारी जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा शब्दही विरोधी पक्ष नेत्यांनी यावेळी दिला. 
Opposition-leaders-visit-flood-hit-areas-in-Satara-district
सातारा जिल्हयातील आंबेघर येथील दुर्घटनेनंतर तेथील पूरग्रस्तांना मोरगिरी गावातील कोयना शिक्षण संस्था शाळेमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी बुधवारी साताऱ्यातील पाटण तालुक्यात आंबेघर आणि मोरगिरीमधील पूरग्रस्त गावकऱ्यांची भेट घेतली. हुंबराळी गावाची पाहणी केली. तसेच कोयनानगर येथील स्थंलातरीत कुटुंबांची भेट घेतली. तसेच मोरणा विद्यालय, मोरगिरी, आणि न्यू इंग्लिश स्कूल, धावडे, तालुका पाटण येथेही भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली. 

अनेकांच्या घर व शेतीचे नुकसान झाले असून, याठिकाणी तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज आहे. यावेळी मदत साहित्याचे वितरण करून तात्पुरत्या स्वरूपातील दिलासा देण्याचा प्रयत्न केला. स्थालांतरीत नागरिकांना धीर देण्याचे काम करत जे जेवण पूरग्रस्तांसाठी देण्यात येते, त्यातीलच जेवण विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद प्रविण दरेकर स्वत:ही जेवले. 

सातारा जिल्ह्यातील अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. लोकांचे संसार पाण्यात बुडाले, अनेक लोकांचे बळी गेले, त्यांच्या नातेवाईकांना धीर देण्यासाठी तसेच त्यांची विचारपूस करण्याकरता दोन्ही विरोधी पक्षनेते सातारा जिल्ह्यात गेले होते. पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करत कराड भाजप युवा मोर्चातर्फे पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कामदेखील करण्यात आले. या स्थलांतरितांचे नातेवाईक पुरामुळे मृत पावले असून, यावेळी त्यांच्या निवासाची व अन्य सोयी सुविधांची विचारपूस केली. तसेच अन्नधान्य व ब्लॅकेंटचे वाटप केले. कोयनानगर येथील स्थलांतरित कुटंबांची भेट घेऊन विचारपूस केली.  या मदतीमध्ये संसारोपयोगी वस्तूंचा ट्रक कोल्हापूरमध्ये पाठवण्यात आला. त्या ट्रकला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी झेंडा दाखवून रवाना होण्यास परवानगी दिली.


Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...