Skip to main content

सामाजिक न्यायाची वसतीगृहे, निवासीशाळा बनली आरोग्य मंदिरे! हजारो कोरोना रुग्णांचा आसरा

पुणे| नाशिक| कोरोना आजाराच्या दुसऱ्या लाटेत सामाजिक विभागाची शासकीय वसतिगृह व निवाशी शाळांमध्ये आरोग्य विभागाने तात्पुरती कोवीड सेंटर उभारली. यामुळे हजारो रूग्णांना आरोग्य सुविधा मिळणे सोपे झाले. सामाजिक न्याय विभागाच्या  वसतिगृह व निवाशी शाळांनी आरोग्यमंदिर होतं महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे.
Health-justice-dormitories-residential-temples-became-health-temples-Shelter-for-thousands-of-Corona-patients
दुसऱ्या लाटेत कोविड-19 ची परिस्थिती गंभीर बनल्याने समाजातील अनेक घटकांना त्यामुळे नुकसान सोसावे लागले तर, अनेकांना आपले जवळच्या व्यक्तीस गमवावे लागले आहे. या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी समाजातील असंख्य घटकांनी कशोसीने प्रयत्न केले. सामाजिक घटकांबरोबर विविध विभागांचे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना देखील सदर परिस्थितीला सामोरे जावे लागले. शासनाच्या विविध यत्रणांचा सहभाग हा देखील तितकाच महत्वाचा ठरला आहे. 
दुसऱ्या लाटेत वसतीगृहे व निवासीशाळा ही आरोग्य मंदिरे बनल्याने राज्यातील हजारो रुग्णांना याद्वारे आरोग्य दानाचे महान कार्य झाले आहे. राज्यातील एकूण 441 शासकीय वसतीगृहातून जवळपास 45 हजार मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय दरवर्षी होत असते. राज्यात अनेक ठिकाणी वसतिगृहांच्या स्वतंत्र सुंदर अशा इमारती उभ्या राहिल्या आहेत. या सुसज्ज इमारतीमधील सोयी-सुविधांमुळे कोविड-19 च्या कालावधी शासनाच्या आरोग्य यंत्रणाचा भार हलका झालेचे दिसून आले आहे. दुसऱ्या लाटेत ‘कोविड’ ची परिस्थिती गंभीर बनल्याने रुग्णालये हाऊस फुल झाली होती. अशा वेळी राज्यातील रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी शासकिय वसतीगृह व निवासी शाळांनी देवदुताची भूमिका बजावली असल्याने त्यातून आरोग्य दानाचे कार्य पार पडले आहे.
राज्यातील एकुण 441 शासकीय वसतीगृहांपैकी जवळपास 211 शासकिय वसतीगृहे ही त्या- त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने ताब्यात घेतलेली आहेत. त्यात 182 वसतीगृहे ही शासकिय इमारतीतील असून 29 वसतीगृहे ही भाड्याच्या इमारतीत आहेत. ह्या 211 शासकिय वसतीगृहामुळे त्या- त्या ठिकाणी हजारो रुग्णांची सोय जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. विशेष म्हणजे बहुतांशी शासकिय वसतीगृहातील अधिकारी/कर्मचारी यांनी जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाखालील कोविड संदर्भात कामकाज केले आहे. कोविड च्या रुग्णाना देखील सदर शासकीय वसतीगृहाचे वातावरण व  सोईसुविधा भावल्या असल्यामुळे  कोविड आजारावर त्यांनी यशस्वी मात केली आहे.

राज्यात अनुसुचित जातीच्या मुलामुलींकरिता 90 निवासीशाळा असुन त्यापैकी 63 निवासीशाळा जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेऊन त्याठिकाणी कोविड सेन्टर सुरु केली होती. सदर निवासी शांळामध्ये 5 ते 10 वी पर्यंत शिक्षणाबरोबरच निवासाची देखील सोय करण्यात आलेली आहे. नाशिक विभागात 53 शासकिय वसतीगृहांपैकी 25 शासकिय वसतीगृहे तर 10 निवासी शाळांपैकी 6 निवासीशाळा ह्या स्थनिक प्रशासनाने ताब्यात घेतल्या होत्या. त्यात नाशिक जिल्ह्यात नासर्डी पूला समोरील समाज कल्याण परिसरात 3 वसतिगृह, आडगांव येथील  मुलांचे शासकीय वसतिगृह, येवला, पिंपळगांव येथील शासकीय वसतिगृह व निवाशी शाळा जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतल्या. अशाच प्रकारे धुळे, नंदुरबार, जळगांव व अहमदनगर या जिल्ह्यांमधील शासकीय वसतिगृह व निवासी शाळा कोविड सेंटर म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत.

सामजिक न्याय विभागाच्या निवासी शाळा, वस्तीगहाचे योगदान महत्त्वपूर्ण: नारनवरे

 “संपूर्ण जगासह राज्यात आल्येल्या कोविड संकटात सामाजिक न्याय विभागाच्या शासकिय वसतीगृहे व निवासी शाळा यांचे योगदान महत्त्वाचे आहे. येणाऱ्या काळात ही शासकीय वसतीगृहे व निवासीशाळा सुरु करण्यासाठीच्या उपाययोजना विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.”

डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...