Skip to main content

रायुकाँ कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज राहावे: मेहबूबभाई शेख

नाशिक| राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हा असे आवाहन नाशिक तालुका आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांनी केले आहे. दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मालेगाव, सटाणा, चांदवड, देवळा नाशिकच्या दौऱ्यावर असतांना मेहबूबभाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग यांनी विविध बैठका, प्रवेशासोहळे आणि आढावा बैठकांचे आयोजन केले होते.
Rayukan-activists-should-be-ready-for-the-upcoming-local-body-elections-Mehboobbhai-Sheikh
नाशिक तालुका आणि देवळाली मतदारसंघ बैठकीत युवकांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागण्यासाठी मार्गदर्शन केले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नाशिक लोकसभा अध्यक्ष  कोंडाजीमामा आव्हाड होते. प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांचे स्वागत तालूका अध्यक्ष गणेश गायधनी आकाश पिंगळे, विशाल गायकर यांनी केले. यावेळी  जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम  कडलग, प्रदेश उपाध्यक्ष सचिन पिंगळे, महीला जिल्हा अध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे, तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे,आदी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सांगितले की, युवकांनी फक्त आदरणीय शरदचंद्र पवार या एका विचाराने प्रेरित होऊन पक्षा साठी झोकून काम करावे, पक्ष तुम्हाला निश्चित न्याय देईल. सर्वांनी एकजुटीने काम करावे. नाशिक हा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराचा एक पुरोगामी जिल्हा आहे. प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकारी यांना संघर्षातूनच संधी मिळते तेव्हा संघर्ष करण्यास डगमगून जाऊ नये. जे पक्षाच्या पडत्या काळातही पक्षासाठी झटत राहिले त्यांना पक्षात प्रथम न्याय दिला जाईल. यावेळी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम  कडलग यांनी प्रास्ताविक केले तर नाशिक तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गायधनी यांनी बूथ कमिटी, गट आणि गण तसेच पदाधिकारी यांचा अहवाल सादर केला.

यावेळी देवळाली विधानसभा अध्यक्ष पदी तुषार खांडबहाले तसेच विधानसभा कार्याध्यक्षपदी चेतन जाधव व युवक जिल्हा उपाध्यक्ष पदी विशाल गायकर यांची तालुका संघटक पदी सुनील लहांगे व अतुल पवार यांची निवड करण्यात आली.यावेळी प्रफुल्ल पवार, विनायक कांडेकर, विशाल गायकर, सचिन पवार, कुंदन ढिकले, अनिल पेखळे, ॲड नवनाथ कांडेकर,तेजश गायकवाड,संदेश टिळे, कुमार गायधनी, अतुल पवार,अक्षय अनवट,अभिषेक गायखे,शुभम जाधव, भास्कर मराडे, संदिप जाधव, महेश शेळके,शुभम थेटे, गोकुळ अनवट, अमित बोकड, धनाजी टोपले,पवण देशमुख, अविनाश फडोळ,आनंद ढेरींग,किरण वायकंडे, योगेश तिदमे, आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन तेजश देसले यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष गणेश गायधनी यांनी मानले.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...