Skip to main content

सामाजिक न्याय विभागास ८२२ कोटीचा निधी प्राप्त! स्वाधार योजनेसह शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लागणार

नाशिक| राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांना कोविड परिस्थितीमुळे निधी उपलब्ध होण्यास दिरंगाई झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. यासंदर्भात समाज कल्याण आयुक्तालय मार्फत शासनाशी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. श्री धनंजय मुंडे मा.मंत्री, सामाजिक न्याय विभाग यांच्या विशेष प्रयत्न व मार्गदर्शनाखाली विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री अरविन्द कुमार व विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सातत्याने निधी मिळणे बाबत मागणी लावून धरली होती. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृती संदर्भात विविध सामाजिक संघटना, प्रसारमाध्यमांनी देखील हा विषय लावून धरल्याने त्याची दखल शासनाकडून घेण्यात आली आहे. 
Social-justice-department-receives-Rs822-crore-The-issue-of-scholarship-will-be-solved-with-Swadhar-Yojana
स्वाधार योजनेसह इतर महत्वाच्या विद्यार्थी हिताच्या विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी शासनाने *सुमारे ८२२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागास वितरित केला आहे.* त्यामुळे सदरचा निधी लवकरच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाकडून वितरित करण्यात आलेला निधी व योजनांचा तपशील पुढीलप्रमाणे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ३० कोटी

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना करिता सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात २०० कोटी रुपयांची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. सन २०२०-२१ मधील विद्यार्थ्यांना दुसरा हप्ता देणे बाकी असल्याने शासनाने मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद पैकी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील प्रलंबित रक्क्मेपोटी रुपये ३० कोटी खर्च करण्यास मंजुरी दिलेली आहे. व सदरचा रुपये ३० कोटी निधी आयुक्तालयास  संगणक प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.. त्यानुसार समाज कल्याण आयुक्तालयाने दिनांक ९ ऑगस्ट २०२१ रोजी राज्यातील विभागीय कार्यालयांना रुपये ३० कोटी वितरित केले आहेत. त्यात मुंबई विभागासाठी ५१ लाख, पुणे विभागासाठी ३ कोटी ४४ लाख, नाशिक विभागासाठी ५४ लाख  ९३हजार, औरंगाबाद विभाग ४ कोटी ३५ लाख ४२ हजार, लातूर विभाग १२ कोटी ८१ लाख ४५ हजार, अमरावती विभाग ४ कोटी ७८ लाख ९६ हजार, नागपूर विभाग ३ कोटी ५३ लाख ७५ हजार असे एकूण ३० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

राजर्ष्री छत्रपती शाहू महाराज  परदेश शिष्यवृत्तीसाठी २० कोटी

परदेशात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांसाठी राजर्ष्री छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्तीची रक्कम देण्यासाठी शासनाने रुपये २० कोटी निधी आयुक्तालयास  संगणक प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे विदेशात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थाना त्याची शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या खात्यात मिळणार आहे.

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे ५८५ कोटी 

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दहावीनंतर विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व शिक्षण शुल्क,परिक्षा शुल्क, व इतर मान्य बाबीवरील शुल्क हे शिष्यवृतीच्या माध्यमातुन दिले जाते. केंद्र शासनाच्या शंभर टक्के निधी या योजने खर्च होत असतो. त्यासाठी देखील शासनाने सन २०२०-२१ वर्षासाठी प्रलबित असलेल्या शिष्यवृत्ती व विद्यावेतन या बाबी खाली सुमारे ५८५ कोटी रुपये इतकी तरतूद समाज कल्याण आयुक्तालयास संगणक प्रणालीवर उपलब्ध करून दिली आहे.

मॅट्रिकोत्तर शिक्षण फी, परीक्षा फी करिता १८७ कोटी ५० लाख रुपये

राज्य शासनाच्या वतीने राज्यातील शासन मान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायन विनाअनुदानित शिक्षण संस्थामधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागामार्फत शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची प्रतिपूती देण्यात येते.. सदर योजनेसाठी शासनाने सन २०२१-२२ या अर्थिक वर्षासाठी २५० कोटी रुपयांची तरतुद अर्थसंकल्पात केली आहे. त्यापैकी चालु अर्थिक वर्षासाठी शासनाने १८७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी आयुक्तालयात वितरित केला आहे. कोविड काळात खर्चाचे अर्थिक बंधने असताना देखील शासनाने सामजिक न्याय विभागास चालु अर्थिक वर्षात ८२२ कोटी रुपयांचा निधी मोठ्याप्रमाणावर उपलब्ध करुन दिला असल्याने राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थाना त्याचा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


प्रलंबित शिष्यवृत्ती मिळण्यास मदत: नारनवरे

“मागसवर्गीय विद्यार्थाना शिक्षणात अडचण निर्माण होऊ नये म्हणुन शासनाने विशेष पाऊले उचली आहेत. यासंदर्भात शासकनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. त्याला यश मिळाले आहे. ही प्रलंबित शिष्यवृतीची रक्क्म लवकरच विद्यार्थ्याच्या बॅक खात्यात जमा होणार आहे ”

डॉ.प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य पुणे. 


Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...