Skip to main content

उद्योगांसाठी भूखंडावर ४० टक्के बांधकामाची अट २० टक्के करू: उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई

मुंबई| महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाशी संबंधित विविध अडचणीसंदर्भात  उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांच्याकडे मंगळवारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विकास नियंत्रण नियमालवली नुसार भूखंडावरील ४० टक्के बांधकाम करण्याची अट शिथिल करून २० टक्के करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. तसेच उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.
We-will-make-the-condition-of-40-percent-construction-on-land-for-industries-20-percent-Industry-Minister-Subhash-Desai
 महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांची भेट घेतली.याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांनी उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांचे अभिनंदन करून करोनाकाळात राबविण्यात आलेल्या योजनांचे स्वागत केले. उद्योगांसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध बाबींकरिता पूर्तता कराव्या लागतात. उदा. चटई  निर्देशांक, इमारत पृणत्वाचा दाखला , ट्रान्सफर मुदतवाढ व अनुदान बाबत असलेल्या अडचणींची माहिती दिली. 

तसेच महाराष्ट्र चेंबरतर्फे नाशिकला महिला क्लस्टरसाठी भूखंड मिळविण्याकरीता बऱ्याच वर्षांपासून प्रयत्न करत आहे. उद्योग मंत्रालयाने महिला उद्योग धोरणानुसार नाशिकच्या महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याकरीता महिला क्लस्टरसाठी भूखंड द्यावा अशी मागणी केली. उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांनी उद्योग मंत्रालयाने सुरु केलेल्या प्रोत्साहन योजनाची (अमेन्सटी स्किम) माहिती उद्योग मंत्रालय व महाराष्ट्र चेंबरमार्फत राज्यातील उद्योजकांपर्यंत पोहचवावी व उद्योगांना फायदा मिळवून द्यावा असे सांगितले.  

शिष्टमंडळात आमदार श्री. चंद्रकांत जाधव, महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. ललित गांधी, विश्वस्त मंडळाचे चेअरमन श्री. आशिष पेडणेकर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पाटील, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, कागल हातकणंगले फायुस्टार मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे गोरख माळी, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सेक्रेटरी नितीन दलवाई प्रभारी सरकार्यवाह श्री. सागर नागरे उपस्थित होते.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...