त्र्यंबकेश्वर| वार्ताहर| महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील ३५ भाविक चार धाम यात्रेसाठी गेले होते. त्यांच्याकडे आरटीपीसीआर रिपोर्ट आणि सींगल व्हॅक्सीन सर्टीफीकेट असून देखील त्यांना उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग येथे अडवण्यात आले, अखेर राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्याशी एकाने संपर्क साधला त्यांनी तात्काळ नाशिकचे खा. हेमंत गोडसे यांच्या कानावर ही बाब टाकल्यावर त्यांनी तात्काळ दिल्ली, उत्तराखंड येथे फोन करून संबंधित भाविकांचे दर्शन घडवून देण्यास सहकार्य करण्यास सांगितले आणि नाशिकच्या भाविकांना दर्शन घेण्याचे समाधान लाभले.
चारधाम यात्रेसाठी गेलेल्या या भाविकांचे आरटीपीसीआर रिपोर्ट आणि सींगल व्हॅक्सीन सर्टीफीकेट असून देखील त्यांना उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग येथे अडवण्यात आले व त्यांची पुन्हा बळजबरीने अँटिजेंन टेस्ट केली गेली त्यात ३४ लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले परंतु १ जणाची टेस्ट पॉजीटीव्ह आली, त्यानंतर त्या व्यक्तीची पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली. तरीदेखील त्यांना १४ दिवस कॉरंटाईन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भाविकांना मोठा मानसिक त्रास झाला. यातून सुटका करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कडलग यांना सचिन लोंढे यांचा फोन आला त्यांनी अडकलेल्या भाविकांशी संपर्क करुन दिला. त्यात गितांजली गाजरे (जाधव) या काँन्फरंन्स काँलवर त्यांचीशी बोलल्या त्या खुप अस्वस्थ होत्या, १०-१२ तासापासुन आम्ही खुप वैतागलो आहोत. आम्ही अनेक लोकांना फोन केले परंतु दादा प्लीज मदत कर अशी विनंती कडलग यांना करू लागल्या.
मग त्यांनी ताबडतोब या प्रकाराची खा. हेमंत आप्पा गोडसे यांना फोनवरून कल्पना दिली. खा. गोडसे यांनी मीटींगमध्ये असतांनाही तात्काळ दाखल घेत पांडे नावाच्या गृहस्थाशी बोलुन मदतीचे सर्व प्रयत्न केले. त्यांनी तेथील स्थानिक अधिकाऱ्यांपासून संसद भवन, महाराष्ट्र सरकार असे २०-२५ कॉल करत सहकार्य करण्यास सांगितले. आणि भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था केली. त्यानंतर कडलग यांना सचिनचा ४-५ तासानंतर कॉल आला की आपली सर्व टीम आता दर्शनाला गेली व सर्व जण त्र्यंबकराजाच्या कृपेने सुखरूप आहेत. त्यानंतर प्रीतम पवार, धर्मेंद्र उपाध्याय, निशा उपाध्याय, सचिन जाधव, गीतांजली गाजरे (जाधव), मोहिनी गाजरे, किरण धनक, सुनीता धनक, मुनीलाल कनोजिया, शकुंतला कानोजिया, कुसुम चितोडीया, अरुणा काळे, रतन गवळी, रंजना करांकळ, तुषार पाटील, नेहा पाटील, संध्या वानखेडे, ललिता खरे, आरोही वानखेडे, उमेश सांगळे, मीना शिंदे, गोपीनाथ उतेकर, सुषमा हिंडलेकर, निहार बनसोडे, शशिकला बनसोडे, प्रदीप बनसोडे, सुनीता उतेकर, हेमा माखवा, नथु पाटील, आशा पाटील, त्रिंबक सावळे, दुर्गा सावळे, रंजना पाटील, स्नेहा या सर्व भाविकांनी खा. गोडसे यांचे आभार व्यक्त केले. तसेच पुरुषोत्तम कडलग यांनी ही महाविकास आघाडी घटक पक्षाचे खासदार यांनी कार्यतत्परतेने मदतीचे आश्वासन देऊन थेट पाठपुरावा केला व सर्वांची सुटका झाली त्यामुळे त्यांचे मनःपुर्वक आभार मानले आहे.