Skip to main content

तपोवन-टाकळीमार्गे मनपाची बस सेवा सुरू; नागरिकांमध्ये समाधान

नाशिकरोड| प्रतिनिधी| नाशिक महानगरपालिका अंतर्गत नाशिक शहर बससेवा तपोवन-टाकळीमार्गे सुरू झाल्याने प्रभाग १६ मधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. प्रभाग १६ मधील ज्येष्ठ नागरिक,  लोकप्रतिनिधींच्या हस्ते बसची पुजा करण्यात येऊन झेंडा दाखवून टाकळीमार्गे बससेवेला प्रारंभ झाला.
Satisfaction-among-the-citizens-with-the-commencement-of-municipal-bus-service-via-Tapovan-Takli
प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे, नगरसेवक श्री राहुल दिवे, नगरसेवक श्री अनिल ताजनपुरे यांनी आगरटाकळी ते रामदास स्वामी नगर थांब्यापर्यंत प्रवाशांसमवेत बस मध्ये प्रवास केला. याप्रसंगी सर्व  लोकप्रतिनिधींच्या हस्ते बस मधील चालक, वाहक यांचा सत्कार करण्यात आला. मागील दिड वर्षांपासून कोविड १९ मुळे टाकळीमार्गे  बससेवेला खंड पडला होता. बससेवा सुरू होण्यासाठी परिसरारातील लोकप्रतिनिधी यांनी विशेष प्रयत्न केल्याने सर्व नागरिकांच्यावतीने नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे, नगरसेविका सौ आशा तडवी,  नगरसेवक श्री राहुल दिवे, नगरसेवक श्री अनिल ताजनपुरे यांचे विशेष आभार मानण्यात आले. याप्रसंगी युगांतर सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवि पगारे (सर), रफिक तडवी, अनिल जोंधळे, सुनील जोंधळे, जयेश सोनवणे, यशवंत साळवे, अलका निकाळे, मीरा मोरे, मीना पगारे, कविता पगारे, राजू जाधव, अजय केला, नंदू पगारे, प्रमोद गोसावी, राजू धनगर, सुनील साळवे, प्रशांत रावळ, भारत लोखंडे, अतुल औटे, अनिल पगारे, शिवाजी सूर्यवंशी, सुखदेव मेसमाळे, पप्पू पवार, विजय साळवे, कैलाश देवरे, गौरव केदारे आदी प्रभागातील नागरिक, महिला तथा सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाकळीमार्गे बसथांब्यासाठी विविध ठिकाणी स्टॉप, वेळापत्रक लवकरच येथे बसवण्यात येईल.

असा असेल मार्ग
---------------------------
पंचवटी निमाणी-तपोवन-टाकळी फाटा-जयशंकर गार्डन चौक-टाकळी गांव-रामदास स्वामी नगर-उपनगरमार्गे नाशिकरोड तसेच सी बी एस-द्वारका-टाकळीफाटा-जयशंकर गार्डन चौक-टाकळी गांव-रामदास स्वामी नगर-उपनगरमार्गे नाशिकरोड.

नागरिकांनी बस सेवेचा लाभ घ्यावा

कोविड - १९ मुळे बससेवेला खंड पडला होता. परिणामी येथील नागरिकांना फारच गैरसोय सहन करावी लागली. परंतु महापालिकेने आता ही अडचण सोडवली असून बससेवेला प्रारंभ झाला. शाळा-महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर येथील शाळकरी मुले-मुली, महाविद्यालयीन युवकांना या बससेवेचा लाभ होईल. नागरिकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा.

सौ सुषमा रवि पगारे, नगरसेविका, प्रभाग क्र १६.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...