Skip to main content

आयफोनची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश: ४२ कोटीचा साठा महसूल गुप्तचर यंत्रणेकडून जप्त

नवी दिल्ली| अचूक गुप्तचर माहितीच्या आधारावर, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी 26 नोव्हेंबर रोजी दोन मालाची तपासणी केली. हा माल हॉंगकाँगहून मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअर कार्गो कॉम्प्लेक्स (ACC), आला होता. आयात मालाच्या दस्तऐवजांमध्ये हा माल "मेमरी कार्ड" म्हणून जाहीर करण्यात आला होता. तथापि, प्रत्यक्ष तपासणीत असे दिसून आले की मालामध्ये खालील वस्तू होत्या अशा प्रकारे, रोखलेल्या मालामध्ये एकूण 3,646 (तीन हजार सहाशे सेहेचाळीस) आयफोन-13 मोबाईल फोन सापडले. कागदपत्रात नमूद न केलेले वर उल्लेख केलेले मोबाईल फोन आणि ऍपल स्मार्ट घड्याळ,या वस्तू सीमा शुल्क कायदा, 1962 अंतर्गत जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे रु. 42.86 कोटी रुपये होती तथापि मालाचे घोषित मूल्य फक्त 80 लाख रुपये होते.
IPhone-smuggling-racket-under-the-guise-of-memory-card-exposed-Revenue-Intelligence-Directorate-action

आयफोन 13 मॉडेल सप्टेंबर 2021 पासून भारतात विक्रीसाठी आले, ज्याची मूळ किंमत रु. 70,000/- रुपये होती आणि काही उच्च श्रेणीतील मॉडेल्सची किंमत 1,80,000 रुपये होती. भारतात मोबाईल फोन्सच्या आयातीवर 44% प्रभावी सीमाशुल्क लागू होते. तस्कर आयफोन 13 सारख्या नवीनतम उत्पादनांसाठी त्यांचे तस्करीचे नेटवर्क किती लवकर प्रस्थापित करतात हे या अत्याधुनिक मॉडेल्सच्या फोनच्या इतक्या मोठ्या प्रमाणावरील तस्करीच्या प्रयत्नातून आढळून येते. या शोधामुळे एक गंभीर आयात फसवणूक उघडकीस आली आहे, ज्यामुळे लक्षणीय महसूल परिणाम दर्शवणाऱ्या तस्करीच्या अनन्य आणि अत्याधुनिक पद्धती शोधून त्यांचा मुकाबला करण्यात महसूल गुप्तचर संचालनालयाची क्षमता अधिक मजबूत झाली आहे. देशाच्या आर्थिक सीमांचे रक्षक म्हणून, महसूल गुप्तचर संचालनालय तस्करीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...