Skip to main content

ओबीसींचे राजकीय आरक्षण घेतल्याशिवाय शांत राहणार नाही: मंत्री छगन भुजबळ

पुणे| माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सर्व प्रथम मंडल आयोग लागू करण्यात आला. त्यातून महाराष्ट्रात विविध क्षेत्रात ओबीसींचे आरक्षण आपल्याला मिळाले. मात्र केंद्र सरकारच्या नाकर्ते धोरणामुळे हे आरक्षण धोक्यात आले आहे. आरक्षण पूर्ववत करण्यासाठी जनगणनेची आवश्यकता आहे. कोरोनामुळे केंद्र सरकार २०२१ ची जनगणना सुरू करत नाही. मात्र महाराष्ट्र सरकारला करण्याचा आग्रह धरत आहे. सरकारने ही जनगणना होईपर्यंत आरक्षण पूर्ववत सुरू ठेवावे अशी मागणी करत ओबीसींचे राजकीय आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले. तसेच या कार्यक्रम प्रसंगी त्यांनी ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे असा ठराव पारित केला.
OBCs-will-not-remain-silent-without-taking-political-reservation-Minister-Chhagan-Bhujbal

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या पुरस्करामध्ये रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे.


यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, मध्यप्रदेश सतनाचे आमदार सिद्धार्थ कुशवाह, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार पंकज भुजबळ, कमलताई ढोले पाटील, जयदेव गायकवाड, दिप्ती चौधरी,बापूसाहेब भुजबळ, प्रा.हरी नरके, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, मंजिरी धाडगे, मनीषा लडकत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,  सुनील सरदार, डॉ.रत्नाकर लाल, पुणे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, प्रा.दिवाकर गमे,  ऍड.सुभाष राऊत, पुणे शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, वैष्णवी सातव, अविनाश चौरे,मनीषा लडकत, आंबदास गरूडकर, यांच्यासह पदाधिकारी व समता सैनिक उपस्थित होते.


यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, छत्तीसगढ राज्यात बहुजन समाजातील नेतृत्व भूपेश बघेल यांच्या रूपाने मुख्यमंत्री पदावर काम करत आहे. त्यामुळे गोर गरिबांचे कामे होत असल्याचे लोकांसाठी जे लढतात ते चिरकाल स्मरणात राहतात त्यामुळे तुमचं नेतृत्व तुम्हीच निर्माण करा असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाले आहे. मात्र काही लोकांना अद्यापही "डायजेस्ट" होत नसल्याची टीका करत सोनिया गांधी, शरदचंद्र पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करत आहे.  हे सरकार आपले पाच वर्षे पूर्ण करेल आणि पुन्हा एकदा येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 


ते म्हणाले पुढे की, फुले, शाहू, आंबेडकर यांच्यामुळे आपल्याला आरक्षण मिळाले. ज्यांनी आपले आयुष्य आपल्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी व्यथित केले त्यांना आपण विसरता कामा नये. सगळीकडे महात्मा फुले व सावित्रीबाई यांचे पुतळे उभारण्यात यावे छत्रपती शाहू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांचे कार्यक्रम घ्यावेत असे आवाहन त्यांनी केले. तसेच गल्ली गल्लीतून फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाचा नारा दिला जावा. देशातील शेतकऱ्यांसाठी लढले पाहिजे. आपल्या न्याय हक्कासाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर वर्षभर लढा दिला. या शेतकऱ्यांच्या लढ्यापुढे मोदी सरकारला झुकावे लागले आहे. शेतकऱ्यांसाठी हा लढा लढण्यासाठी आपण पुढे न्यायला पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

ते म्हणाले की, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद देशभरात काम करत असून देशभरात आरक्षणाची लढाई लढली जात आहे.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येत असून तीन जानेवारी रोजी हा पुतळा विद्यापीठात बसविण्यात येणार आहे. तसेच महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक एकत्र जोडले जाणार असून भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरु करण्यात येईल. पुतळे उभे करण्यासोबतच त्यांच्या विचारांची कामे प्रत्यक्षात उभे करून त्यांची खरी स्मारक उभी करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.


*देशातील खाजगीकरणाच्या विरोधात सामूहिक लढ्याची गरज - मुख्यमंत्री भूपेश बघेल*

यावेळी मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, देशातील सर्व शासकीय प्रकल्प विकण्याचा घाट केंद्र सरकार कडून घातला जात आहे. त्यामुळे शासकीय नोकऱ्या कमी झाल्या आहे. त्यामुळे आपल्याला २७ आरक्षण जरी मिळाले तर शासकीय नोकरीच मिळणार नाही. त्यामुळे खाजगीकरणाच्या विरोधात लढावे लागेल असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच आरक्षण वाचविण्यासाठी छत्तीसगढ राज्यात ओबीसींची जनगणना करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की,  महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाज सुधारणेच्या कामाची सुरुवात या भावनातून झाली. समाजातील वंचित पिडीत शोषित घटकाला न्याय देण्यासाठी सर्व काही पणाला लावले. महिलांना समाजात सन्मान देण्याचे काम त्यांनी केले. वाड्यात या विहिरीत पाण्याने समाजातील वंचित घटकांची तहान भागविली त्यातून समाजक्रांती झाली. या समाज सुधारकांच्या या भूमीला वंदन करतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, महात्मा फुले यांचे वयाचे ६३ वर्ष समाज क्रांतीचा लढा दिला. त्यांनी लावलेली ज्योत आजही तेवत आहे. उत्कट क्रांतीकारी जीवन महात्मा फुले यांचे होते. कुठल्याही समस्ये पासून त्यांनी माघार न घेता समाजातील वंचित, पीडित घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. अंधविश्वासावर प्रहार करून ती नष्ट करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. देशात साडेतीन हजार वर्षे पीडित समाजाने काम केलं. त्यामुळे जगाच्या आर्थिक उत्पन्नात भारताचा २३ टक्के वाटा होता. त्यामुळे भारताला सोने की चिडीया असे संबोधले जात होते. ब्रिटिश आल्यानंतर परिस्थिती बदलली. त्यावेळी समतेची ज्योत महात्मा फुले लावली. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढले त्यांना न्याय मिळवून दिला. त्याच महात्मा फुले यांच्या विचारांवर छत्तीसगढ राज्य कार्य करत असून शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, सत्यशोधक समाजाची स्थापना करून शिक्षणाच्या माध्यमातून सत्याचा आग्रह धरला त्यातुन अंधविश्वास दूर करण्यास प्रयत्न केले. महात्मा फुले यांचे विचार आणि पुढे महात्मा गांधी यांचे सत्याचे प्रयोगातून पुढे नेले. महात्मा फुले यांचे विचार महात्मा गांधी यांनी पुढे नेले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हेच विचार संविधानाच्या माध्यमातून आपणास दिले. ते संविधान आज धोक्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महात्मा फुले समाजिक क्रांतीचे अग्रणी तर महात्मा गांधीजी राजकीय समाज सुधारणेचे अग्रणी होते. महात्मा फुले, महात्मा गांधी यांच्या काळात ज्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्या आज पुन्हा निर्माण झाल्या असून त्याविषयी आपल्याला लढावे लागेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रा.हरी नरके म्हणाले की, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना नमन केले होते. देशात जातीवादी धर्मवादी ताकद वाढत असून आपल्याला यापासून महात्मा फुले, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार वाचवू शकतात. भारत सरकार देशातील प्रत्येक ओबीसी नागरिकाला केवळ १८ रुपये देते त्यात चहा देखील विकत मिळत नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, सद्याच्या सरकारमुळे देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. आरक्षण वाचवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ विशेष प्रयत्न करत आहेत. छत्तीसगढ राज्यात देखील ओबीसींच्या हक्कासाठी सर्व प्रथम मुख्यमंत्री बघेल यांच्या नेतृत्वात जनगणना करण्यात होत असून हे कार्य महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे असून त्या निमित्ताने आज समता परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बालबुधे यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष बापू भुजबळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.नागेश गवळी यांनी तर आभार प्रदर्शन प्रित्येश गवळी यांनी केले.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...