Skip to main content

पंचवटी विभागात राष्ट्रवादी काँग्रेस राबवणार परिवार संवाद अभियान: दिलीप खैरे

नाशिक| आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रणशिंग फुंकले असून पंचवटी विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 'राष्ट्रवादी परिवार संवाद अभियान' राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंचवटी विभागाची बैठक आज पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. 
NCP-to-launch-family-dialogue-campaign-in-Panchavati-division-Dilip-Khaire

नाशिक महानगरपालिका पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा घेत निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यानुसार विभागवार अध्यक्षांच्या नेमणूका देखील करण्यात आलेल्या आहे. त्यानुसार आज प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव गोवर्धने, माजी महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, पंचवटी विभागीय अध्यक्ष शंकर मोकळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचवटी विभागाची बैठक पार पडली.


यावेळी मोतीराम पिंगळे, सुरेश आव्हाड, सुरेखा निमसे, संतोष जगताप, निलेश जगताप, सरिता पगारे, चिन्मय गाढे, सागर लहामखेडे, किरण पानकर, गणेश पेलमहाले,महेश शेळके, विजय पेलमहाले, रामेश्वर साबळे,आर्यन मोकळ, वैभव अभंग, गणेश सदाफुले, बजरंग गोडसे, सागर अभंग, निलेश जगताप, साहिल मोकळ, सचिन काळसरे, हिमांशू चव्हाण, विलास वाघ, रुपाली खैरे, प्रफुल्ल पाटील, वनिता आहेर, मीनाक्षी काकळीज, स्वप्नील निकम, अरविंद सोनवणे, विशाल वाघ, विकास इंगळे, आकाश कोकाटे, संध्या निकाळे, संगीता घाडगे यांच्यासह सर्व सेलचे विभाग अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष उपस्थित होते.

यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे म्हणाले की, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आगामी महापालिका निवडणूक लढविण्यात येणार असून या निवडणुकीत जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आपल्याला अधिक प्रयत्न करावे लागणार आहे. त्यादृष्टीने सर्व विभागातील पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पंचवटी विभागात राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद अभियान सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संवाद अभियानाच्या माध्यमातून पक्षातील ज्येष्ठ नेते, आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक यांच्या भेटीगाठी घेऊन पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बाळासाहेब कर्डक म्हणाले की, राष्ट्रवादी संवाद अभियानाच्या माध्यमातून पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी, इच्छुक उमेदवार, समाजसेवक यांच्या भेटीगाठी घेऊन पक्षाचे अध्यक्ष पवार साहेब व पक्षाचे विचार, ध्येय धोरणे याबाबत संवाद घडवून आणण्यात येईल. तसेच नाशिक महानगरातील समस्या जाणून घेऊन आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पंचवटी विभागीय अध्यक्ष शंकर मोकळं, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात आपले मते मांडली.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...