Skip to main content

छगन भुजबळ शिवसेनेत असते तर नक्की मुख्यमंत्री झाले असते: उद्धव ठाकरे

मुंबई| भुजबळ यांच्या अमृतमोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, देशाचा व भुजबळांचा अमृतमहोत्सव हा योगायोग म्हणावा लागेल. कोणी तीन वर्षांपुर्वी सांगितले असते या सोहळ्याला मी उपस्थित राहिल तर कोणाचा विश्वास बसला नसता. पण नियतीच्या मनात हेच होतं. आज प्रत्येकाच्या हातात मशाल देण्याची गरज आहे. भुजबळ शिवसेनेत असताना मशाल चिन्हावर निवडून आले. अजीत पवार यांनी सांगितले की भुजबळ सरकार वाचविण्यात वाकबगार आहे. हे तेव्हाच सांगायचे होते. कामाला लावले असते असे म्हणताच सभागृहात हस्याचे फवारे उडले. 
Celebration-of-Chhagan-Bhujbals- birthday-mumbai-shamukhanand-sabhagruh
ते म्हणाले की, भुजबळांनी शिवसेना सोडली हा आमच्यासाठी मोठा धक्का होता. यातून सावरायला मोठा वेळ लागला. पण नंतर बर झालं तुम्ही मातोश्रीवर येत हे मतभेद मिटवले. हे पहायला मा हव्या होत्या असे सांगत. भुजबळ हे वयाने तरुण आहेत. सेनेमध्ये असताना कधी त्यांनी दुरुपयोग केला नाही. त्यांनी जिद्दिने वाटचाल केली. अडीच वर्षांपुर्वी महाविकास आघाडीचा प्रयोग देशाने पाहिला. तुमचे मार्गदर्शन लाभले. पण सध्या वैचारीक उंची पहायला मिळत नाही. वैचारीक एफएसआय जादा असायला हवा.  भुजबळ हे डगमगणारे व जिद्दिने उभे राहणारे वादळ आहे. आणखी लढाई लढायची आहे. पुढिल काळात देखील साथ सोबत राहु द्या. तुम्ही तुमची ७५ वर्ष पूर्ण केली. आता पुढच्या ७५ वर्षांनी पुन्हा बोलवा असे सांगत त्यांनी दीर्घायुश्याच्या भुजबळांना शुभेच्छा दिल्या.



*भुजबळ लढाऊवृत्ती असेलेलं संकटांना न डगमगणारं नेतृत्व - अजित पवार*

यावेळी अजित पवार म्हणाले की, छगन भुजबळ यांचा मी चाहता असून नेता बहुजनांचा नेता बहुगुणांचा असा छगन भुजबळ यांचा परिचय आहे. १९८६ मध्ये भुजबळ साहेब दुबईचा व्यापारी इकबाल शेखच्या वेशात बेळगाव मध्ये घुसले होते. त्याबद्दल त्यांना अटक देखील झाली नंतर त्यांना जेल देखील झाली. मराठी माणसाचा आवाज सीमा भागामध्ये कमी होणार नाही यासाठी ते काम करत राहिले. आज देखील काही पक्ष संघटना ओबीसी बांधवांच्या करता खोटे गळे काढत आहेत. परंतु ते मगरीच्या अश्रू आहेत. देशात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या वेळेस राज्यांमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये अतिशय ठोस भूमिका घेण्याचं काम हे भुजबळ साहेबांनी केलं. राज्यात आघाडीचे सरकार वाचविण्यासाठी छगन भुजबळ यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. नाशिकमध्ये त्यांनी केलेला विकास, केलेल्या सुधारणा या अतिशय उत्कृष्ट आहे. छगन भुजबळ हे लढाऊवृत्ती संकटांना न डगमगणार संकटावर मात करणारे नेतृत्व आहे.

ते म्हणाले की, एखाद्या गोष्टीत लक्ष घालून जीव ओतून काम करणे हा छगन भुजबळ यांचा स्वभाव आहे. ओबीसी बांधवांच्या आरक्षणाच्या हक्कासाठी स्वतःची राजकीय कारकीर्द आणि जीवन धोक्यात टाकण्याची जोखीम त्यांनी पत्करलेली होती. याची नोंद या निमित्ताने आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. १० जून १९९९ ला ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्याच्यानंतर खरंतर लगेच निवडणुका झाल्या. सहा महिने आधी निवडणुका घेतल्या. भुजबळ साहेबांनी आणि बाकीच्या सगळ्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. त्यानंतर आघाडीची सत्ता आली त्यात त्यांनी उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भूषविले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या तोडीस तोड काम करून दाखवलं. दिल्लीत त्यांनी महाराष्ट्र सदन उभारलं. हे देशातील अतिशय उत्कृष्ट सदन आहे. यासाठी एकही पैसा दिला नसतांना नाहक बदनामी करण्यात आली. देशात एखाद्याची प्रतिमा मलिन करण्याचे घाणेरडे राजकारण काही जण करतात. त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे असे त्यांनी सांगितले.


*छगन भुजबळ हे वादळ, देशात पुन्हा एकदा मशाल पेटविण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होईल – माजी मंत्री बाळासाहेब थोरात*

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, भुजबळ यांना विधानभवनात १९८५ साली पाहण्याचा योग आला. त्यांची सभागृहात एंट्री वादळी होती. त्यांनी विविध प्रश्नावर सभागृह गाजवत स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. त्यावेळी सभागृहात राम नाईक, दत्ता पाटिल, मृणाल गोरे असे अनेक तरुण आक्रमक चेहरे होते. पण भुजबळ त्यात वेगळे होते. १९९२ ला ते कॉंग्रेसमधे आले. १९९५ ला ते विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते होते. त्यावेळी भुजबळ नावाच वादळ पहायला मिळाले. सरकारला धारेवर धरणारे भुजबळ सर्वत्र गाजले. १९९९ ला दोन्ही कॉंग्रेगसची सत्ता येण्यास जे प्रमुख वक्ते होते. त्यात भुजबळ हे अग्रभागी होते. सत्ता येण्यास वरचा क्रमांक भुजबळांचा होता. त्यावेळेस दोन्ही कॉंग्रेसची आघाडी व्हावी यासाठी त्यांचा मोठा वाटा होता असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, काही नेते पुरोगामी होते. पण प्रत्यक्ष राजकारणात हे विचार त्यांना पुढे नेत वाटचाल करणे जमले नाही. म्हणून ते संपले. पण भुजबळांनी पुरोगामी विचार व राजकारणात प्रॅक्टिकली अंमलात आणत वाटचाल केली. या दोन्ही बाबींचा त्यांनी सुंदर मिलाफ घातला. २००३ मध्ये आघाडी सरकार टिकवण्यात भुजबळांचा मोठा वाटा होता. समीर भुजबळ यांचीही साथ मिळाली. विलासराव देशमुख नेहमी म्हणायचे सरकार भुजबळांमुळे टिकले असे सांगायचे. आता देशात लोकशाही व संविधान धोक्यात आहे. पुन्हा एकदा मशाल पेटवण्याचे काम भुजबळांना करायचे आहे. मशाल पेटवायला हात आहे व हातावर घड्याळ आहे, असे सांगत देश वाचवायचे काम पुन्हा तुम्हाला करायचे असे आवाहन केले.


*छगन भुजबळ केवळ ओबीसी नव्हे तर दिनदलित वंचितांच्या हितासाठी लढणारे संघर्ष योद्धा – खा.प्रफुल्ल पटेल*

यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले की, महाराष्ट्रासह देशातील दिनदलित वंचित व उपेक्षितांचे नेते व शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर काम करणारे छगन भुजबळ हे संघर्ष योध्दा आहेत. केवळ ओबीसींच नव्हे तर प्रत्येक समाजासाठी लढणारा योध्दा अशी भुजबळांची ओळख आहे. त्यांच्या ६१ चा सोहळा मुंबईतील शिवाजी पार्कवर मोठ्या जनसमुदायासमोर झाला होता. आज छगन भुजबळांचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने जमलो आहेत पुढे आपण त्यांची शंभरही साजरी करु असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, छगन भुजबळ शिवसेनेत असतांना १९८५ साली मशाल चिन्हावर पहिले आमदार म्हणून निवडून आले होते. त्याचवर्षी नगरसेवक व मुंबईचे महापौर निवडले गेले होते. भुजबळांचा राजकीय प्रवास अतिशय मोठा आहे. त्यांचा शतकमहोत्सवही कार्यक्रम देखील आपण साजरा करु, त्यावेळी देखील मीच समन्वयक राहिल, असे सांगत त्यांनी छगन भुजबळांना ७५ वर्षपूर्ण केल्याबद्दल व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमदार कपिल पाटील व आभार प्रदर्शन आमदार सचिन आहिर यांनी केले.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...