Skip to main content

आयएसपी- सीएनपी प्रेस कामगारांच्या ४८ वारसांना अखेर नोकरीत सामावून घेतले

नाशिकरोड| प्रतिनिधी| नाशिकरोड येथील आयएसपी प्रेस मजदूर संघाच्या अथक प्रयत्नामुळे इंडिया सिक्युरिटी प्रेसमधील 22 तर नोट प्रेसमधील 26 मयत कामगारांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेण्यात आले. वीस वर्षानंतर अशी भरती प्रथमच झाल्याने कामगारांनी स्वागत केले.

Isp-cnp-press-kamgar-varsanna-akher-ruju-karun-ghetle

वारसांना कामावर रुजू करून घेण्याचा कार्यक्रम प्रेसच्या युएस जिमखान्यावर आज धनोत्रयोदशीच्या मुहूर्तावर झाला.यावेळी खासदार हेमंत गोडसे, आयएसपीचे मुख्य महाव्यवस्थापक राजेश बन्सल, सीएनपीचे बोलेवर बाबू, मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, जयराम कोठुळे, प्रविण बनसोडे, खजिनदार अशोक पेखळे, सहसचिव संतोष कटाळे, अविनाश देवरुखकर, अशोक जाधव, राजू जगताप, इरफान शेख, राहुल रामराजे, बबन सैईद, योगेश कुलवधे, बाळासाहेब ढेरिंगे, अन्ना सोनवणे, ज्ञानेश्वर गायकवाड, संतोष कुलथे, सचिन दिवटे, देवीदास गोडसे, आयएसपीचे महाव्यवस्थापक व्यंकटेश कुमार, विनोद महारिया, सीएनपीचे उपमहाव्यवस्थापक नवीन कुमार आदींची प्रमुख उपस्थिती  होती.


मयत कामगारांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर प्रेसमध्ये कामावर घेणे हा प्रेस कामगारांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. सन 2012 च्या आधीच्या कामगार नेत्यांनी प्रेस व्यवस्थापनाशी करार करून वारसांना नोकरीएवजी पैसे देण्याचा करार केला होता. त्यामुळे मयत कामगारांच्या वारसा भरतीचा मार्ग बंद झाला होता. 2012 साली मजदूर संघाची सूत्रे कामगार पॅनलच्या हाती येताच या वारसांना नोकरी मिळावी यासाठी मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी प्रयत्न सुरु केले. पत्रव्यवहार, कायदेशीर आधार, पेपर वर्क आदी मार्गांनी त्यांनी प्रयत्न सुरु ठेवले होते. त्याला यश आले. 4 फेब्रुवारी 2013 नंतरच्या मयत कामगारांच्या वारसांना दोन्ही प्रेसमध्ये नोकरीवर घेण्याचा कायदा प्रेस महामंडळाने मंजूर केला. परंतु, कृती होत नव्हती. त्यामुळे जगदीश गोडसे यांनी खासदार हेमंत गोडसेंच्या मदतीने पुन्हा दिल्लीपर्यंत प्रयत्न सुरु ठेवले. सुरुवातीला दोन टप्प्यात भरतीनंतर पुन्हा समस्या आल्या. कायदेशीर अडचणींवर मात करत आता 48 मयत कामगारांच्या वारसांना कामावर रुजू घेण्यात आले.


जगदीश गोडसे म्हणाले की, कायदेशीर लढाई जिंकून आम्ही मयत  कामगारांच्या वारसांना न्याय मिळवून दिला, याचा मोठा आनंद होत आहे. यामध्ये खासदार हेमंत गोडसे यांची भूमिका महत्वाची आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच ही भरती शक्य झाली. हेमंत गोडसे म्हणाले की, नाशिकरोड प्रेसमधील मजदूर संघाचे काम संपूर्ण देशातील प्रेसमध्ये वाखणण्याजोगे आहे. नाशिकरोड प्रेस मजदूर संघाचे नेतृत्व कुशल व जागरूक आहे. कामगारांच्या समस्या सोडविण्यात अग्रेसर आहे. आम्ही सर्वांनी मिळून हा प्रश्न सोडवला याचे समाधान वाटते. भविष्यातही कामगार हितासाठी आम्ही संयुक्तपणे प्रयत्न करत राहू. 

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...