Skip to main content

नव्या व्हेरियंटबाबत आरोग्य खाते सतर्क; राज्यांनी पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने इन्साकॉगकडे पाठवावे: डॉ मांडविया

नवी दिल्ली|केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी काही देशांमध्ये कोविड-19 रुग्णांच्या संख्येत नुकत्याच झालेल्या वाढीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतातील कोविड-19 परिस्थितीचा आणि स्थितीवर देखरेख, प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य प्रणालीच्या सज्जतेचा  एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला.  
States-Union-Territories-to-send-samples-of-positive-patients-to-INSACOG-Dr-Mandavia
या बैठकीला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती प्रवीण पवार, नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉक्टर व्ही के पॉल आणि इतर वरिष्ठ अधिकारी तसेच सार्वजनिक आरोग्य तज्ञ उपस्थित होते.  यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना जगभरातल्या कोविड-19 परिस्थितीची आणि स्थानिक पातळीवर दिसत असलेल्या चित्राची माहिती देण्यात आली. चीन, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि अमेरिका यांसारख्या काही देशांमध्ये कोविड-19 रुग्णांच्या संख्येत झालेल्या वाढीने निर्माण झालेल्या आव्हानाला अधोरेखित करत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आपल्या सज्जतेचे आणि नव्या आणि उदयाला येणाऱ्या कोविड-19 परिवर्तकाच्या विरोधात, विशेषतः आगामी काळात येऊ घातलेल्या उत्सवाच्या तोंडावर  सज्ज राहण्याचे आणि दक्ष राहण्याचे महत्त्व नमूद केले. कोविड-19 अद्याप संपलेला नाही याकडे लक्ष वेधत आणि या इशाऱ्याचा पुनरुच्चार करत त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना पूर्णपणे दक्ष राहण्याचे आणि परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. 

लोकांनी कोविड 19 प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या वर्तनाचा अंगिकार करावा आणि कोविड प्रतिबंधक लस घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. देशामध्ये जर कोणतेही नवे उत्परिवर्तक पसरत असतील तर त्यांचा वेळेत शोध घेण्यासाठी, पॉझिटिव्ह रुग्णांच्या नमुन्याची संपूर्ण जनुकीय क्रमवारी इंडियन सार्स कोव्ह-2 जिनोमिक्स कन्सोर्टियम( इन्साकॉग) च्या जाळ्याच्या मदतीने निश्चित करण्यासाठी देखरेख प्रणाली बळकट करण्याचे निर्देश डॉ. मनसुख मांडविया यांनी दिले. यामुळे योग्य प्रकारच्या सार्वजनिक आरोग्य उपाययोजना हाती घेता येतील. कोणताही नवा उत्परिवर्तक असल्यास कोविड-19 च्या सर्व पॉझिटिव्ह रुग्णाचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी दररोज इन्साकॉग जिनोम सिक्वेन्सिंग लॅबोरेटरीज (आयजीएसएल) कडे पाठवावेत अशी विनंती राज्ये/केंद्रशासित प्रदेश यांना करण्यात आली आहे. 

यावेळी एका सादरीकरणाद्वारे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना भारतात 19 डिसेंबर 2022ला संपलेल्या आठवड्यात दैनंदिन रुग्णाच्या संख्येत नियमित गतीने घट होत असल्याची आणि ही संख्या दिवसाला सरासरी 158 पर्यंत खाली आल्याची माहिती देण्यात आली.   मात्र, गेल्या 6 आठवड्यांपासून जागतिक दैनंदिन सरासरीमध्ये निरंतर वाढीची नोंद  झाली असून 19 डिसेंबर ला संपलेल्या आठवड्यात दररोज सरासरी 5.9 लाखांपर्यंत नव्या रुग्णांची नोंद होत आहे.  BF.7 हा नवा आणि अतिशय जास्त संसर्गकारक असलेला ओमायक्रॉनचा उत्परिवर्तक चीनमंध्ये खूप जास्त प्रमाणात झालेल्या संसर्गवाढीला कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने  यापूर्वीच जून 2022 मध्ये कोविड-19 संदर्भात सुधारित देखरेख धोरणासाठी परिचालनात्मक मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. यामध्ये वेळेवर निदान, विलगीकरण, चाचणी आणि संशयित आणि आजाराची पुष्टी केलेल्या रुग्णाचे योग्य व्यवस्थापन यांचा समावेश आहे. या सर्वांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिले.  केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रो. अजय कुमार सूद, जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. आर एस गोखले, आयुष सचिव राजेश कोटेचा, आरोग्य संशोधन विभागाचे सचिव डॉ. राजीव बहल, डीजीएचएस डॉ. अतुल गोयल, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव अग्रवाल, कोविड कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन के अरोरा, राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार समूह(एनटीएजीआय) या बैठकीला उपस्थित होते.   

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...