Skip to main content

गांधीनगर मुद्रणालयाचा कायापालट होणार; २३२ कोटींचा आराखडा तयार

नाशिकरोड|प्रतिनिधी| गेल्या अनेक वर्षांपासून गांधीनगरच्या सरकारी मुद्रणालयाला उतरती कळा लागलेली आहे. काळानुरुप येथील व्यवस्था आणि साधन सामुग्रीत प्रशासनाने बदल न केल्याने मुद्रणालय जीर्ण झाले आहे. गांधीनगर मुद्रणालयाचे अत्याधुनिकरण झाल्यास गांधीनगरला पुन्हा एकदा नव्याने झळाळी मिळेल या जिद्दीपोटी गेल्या काही वर्षांपासून खासदार हेमंत गोडसे यांच्या सुरु असलेल्या प्रयत्नांना यश येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


गांधीनगर येथील जुनाट आणि जिर्ण झालेल्या मशिनरी बदलण्यासाठी आणि मोडकळीस झालेल्या इमारतींच्या पुर्न:विकासाठी केंद्राच्या मुद्रण संचालनालयाकडून २३२ कोटीचा आराखडा तयार करण्यात आला असून कामगारांची संख्या १२० वरून ३१५ पर्यंत वाढवण्यात येणार आहे. लवकरच गांधीनगर प्रेसच्या ११० एकर जागेमधील प्रेस कारखान्यासह प्रेस कॉलनीमधील सोसायट्यांचा पुर्नविकास होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. 


अनेक वर्षांपासून शासनाने गांधीनगर प्रेसमधील मुद्रणालय आणि इमारतींकडे दुर्लक्ष केले आहे. येथील इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. सेवानिवृत्त झालेल्यांच्या जागांवर नोकरभरती न केल्याने या मुद्रणालयात कामगारांचा तुटवडा निर्माण झालेला आहे. परिणामी मुद्रणालयातील प्रिंटीग (छपाई) चे काम अतिअल्प झालेले आहे. यामुळे मुद्रणालयाला उतरती कळा लागली आहे. चार वर्षांपासून हेमंत गोडसे यांनी मुद्रणालयाचे आधुनिकीकरण व्हावे यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरु केलेला आहे. वेळोवेळी तत्कालीन केंद्रीय मंत्री हरदिपसिंग पुरी यांची भेट घेत मुद्रणालयाचे लवकरात लवकर आधुनिकीकरण करण्याची आग्रही मागणी केली होती. दरम्यानच्या काळात केंद्रीय प्रिंटिग विभागाचे संचालक जी. पी. सरकार यांनी गांधीनगर येथे दौरा करत कारखाना आणि इमारतींची पाहणी केली होती.

गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने केंद्राच्या मुद्रण संचालनालयाने गांधीनगर प्रेसचे आधुनिकरण करण्यासाठी २३२ कोटींचा आराखडा तयार केला आहे. प्रेसच्या ११० एकर जागेपैकी २८ एकर जागेत कारखाना तर ६५ एकर जागेत निवासी कॉलनी आहे. १६ एकर जागा पडीक आहे. २३२ कोटींच्या आराखडयात ग्राऊंड प्लस तिन मजली प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार असून सुमारे २० हजार चौरस मीटरचे बांधकाम मिळणार आहे. इतर जागेमधील निवासी इमारतींचा पुर्न:विकास करण्यात येणार असून विविध सांस्कृतिक उपक्रमांसाठी प्रशस्त कम्युनिटी हॉल बांधण्यात येणार आहे. प्रशासकीय इमारत उभारण्याकामी आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुर्नःबांधनीसाठी सुमारे १५० कोटींचा तर जुनाट आणि जीर्ण झालेली मिशनरी बदलण्यासाठी आणि सामुग्री उपलब्धीसाठी ८२ कोटी रुपयांची आराखड्यात तरतूद करण्यात आली आहे. याविषयी प्रस्तावास केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांनी मान्यता दिली असून सदर प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी लवकरच अर्थ मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. यामुळे गांधीनगर प्रेसला नव्याने झळाली मिळणार असल्याची माहिती हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...