Skip to main content

'आयबीटी’च्या उपक्रमाला आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या ‘ब्रायडल लुक’ची झळाळी

नाशिक|दुबईस्थित मॉडेलद्वारा सादर करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचा ‘ब्रायडल लुक’ आणि कोड असलेल्या स्कीनवरील नववारी लुक.. आयबीटीला जाहीर झालेली सिड्यास्को संस्थेची अधिस्वीकृती.. सुमारे तीनशे सौंदर्यवतींचा उत्स्फूर्त सहभाग आणि उपस्थितांना लाभलेले सौंदर्यशास्त्रातील करियर मार्गदर्शन हा चतु:ष्कोन आयबीटीद्वारा नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमाचे वेगळेपण अधोरेखित करून गेला.
International-quality-Bridal-Look-shines-in-IBTs-initiative

आयबीटी संस्थेच्या वतीने हॉटेल सेलेब्रिटा येथे सदर सेमिनाररुपी कार्याक्रमाचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी दुबईस्थित मॉडेल क्रिस्टीना हिने आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचा ‘ब्रायडल लुक’ सादर केला. उपस्थित  सौंदर्यवतींच्या अपेक्षेला साद घालत केलेल्या या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद मिळाली. याव्यतिरिक्त दुसऱ्या एका मॉडेलने प्रथमच कोड असलेल्या स्कीनवरील नववारी लुक सादर करून सौंदर्यवतींची वाहवा मिळवली. या दोन्ही सादरीकरणातील मॉडेल्सचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील मेकअप आर्टिस्ट भाग्यश्री धर्माधिकारी यांनी केलेला मेकअप देखील कौतुकाचा विषय ठरला. कारण दोन्ही मेकअप लाईव्ह पद्धतीने दाखवण्यात आले.

याप्रसंगी सिड्यास्को संस्थेच्या प्रमुख सीमा गोपुचकर, आयबीटी नाशिकच्या संचालिका भाग्यश्री धर्माधिकारी, संचालक गौरव धर्माधिकारी आदी उपस्थित होते. याप्रसंगी भाग्यश्री धर्माधिकारी यांनी सौंदर्यशास्त्र उद्योग क्षेत्रातील करियरच्या संधी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी नाशिक आणि संगमनेर येथील आयटीआयचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आयबीटीला सिड्यास्कोची अधिस्वीकृती

दरम्यान, या सेमिनार प्रसंगी आयबीटी संस्थेला सिड्यास्कोची अधिस्वीकृती मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. याप्रसंगी सिड्यास्को संस्थेच्या प्रमुख सीमा गोपुचकर यांच्या हस्ते धर्माधिकारी दाम्पत्याने त्याचा स्वीकार केला. अशा प्रकारचा बहुमान उत्तर महाराष्ट्रात केवळ आयबीटी संस्थेला मिळाल्याचे गोपुचकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले. मेकअप आणि स्कीन कोर्सेसच्या माध्यमातून करियर करू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांनी ७७७०० ७०१०८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...