Skip to main content

राज्य कृषिसेवा महासंघाच्या अध्यक्षपदी कैलास मोते. सरचिटणीसपदी अभिजित जमधडे यांची निवड

नाशिक| शासनाच्या कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची संघटना असलेल्या राज्य कृषिसेवा महासंघांच्या पुनर्गठनासाठी सोमवारी पुण्यात बैठक झाली. या बैठकीत महासंघाच्या अध्यक्षपदी कृषी संचालक कैलास मोते तर सरचिटणीसपदी तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
Kailas-Mote-as-the-President-of-the-State-Agricultural-Service-Federation-of-selection-and-Abhijit-Jamhadhe-as-General-Secretary
तांत्रिक, अतांत्रिक अधिकारी कर्मचाऱ्यांचे एकत्रित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कृषी विभागातील सर्व वर्गांतील संघटनांचा मिळून एकसंघ अशा महासंघाची पुनर्बांधणी करण्यात आली. तसेच कोषाध्यक्ष-संदीप केवटे, कार्याध्यक्ष- बालाजी ताटे, संजय पाटील व जितेंद्र पानपाटील, राज्य उपाध्यक्ष- विक्रांत परमार, प्रीती हिराळकर, बंडा कुंभार, शिवाजी राठोड, झाकीर हुसेन मुलाणी यांची ही निवड करण्यात आली.

कृषी सेवा महासंघ कृषी विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्या खालील एकसमान प्रश्नावर काम करणार आहे. 

1)आकृतीबंध- कृषी विभागाचा आकृतीबंध महसूल,ग्रामविकास,जलसंपदा या विभागाच्या धर्तीवर बळकट करतानाच, पदोन्नतीच्या संधी देणारा व कार्यालये बळकटीकरण करणारा  करतानाच,समय मर्यादित पणे मान्य होण्यासाठी कार्य करणे. 2.)समकक्षता- केंद्रीय कृषी मंत्रालयाने सन 2017 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार कृषी विभागाची समकक्षता राज्यातील इतर तांत्रिक विभागा बरोबर प्रस्थापित करणे. 3.)आस्थापना- अधिकारी/कर्मचारी यांचे आस्थापना विषयक प्रश्न सामोपचाराने मार्गी लावणे. 4.)पदोन्नती- कृषी विभागातील रखडलेल्या पदोन्नती जलदगतीने मार्गी लावणे. आदीं प्रश्नांवर भर राहणार आहे. 

या बैठकीला कृषी विभागातील तांत्रिक तसेच अतांत्रिक अधिकारी/कर्मचारी यांच्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते,तसेच कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक (विस्तार) श्री.विकास पाटील सा. व विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संवर्गातील अति वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते अशी माहितीमहाराष्ट्र राज्य कृषीसेवा महासंघाचे सरचिटणीस अभिजित जमधडे यांनी दिली आहे.

 

 

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...