Skip to main content

त्र्यंबकेश्वर येथे रेशनिंग दुकानदारांची आढावा बैठक; विविध प्रश्नांवर उहापोह

त्र्यंबकेश्वर| रेशनिंग दुकानदारांचे विविध प्रश्न  सोडवण्याच्या दृष्टीने  त्र्यंबकेश्वर येथील श्री चंद्र गार्डन लॉन्स येथे फेडरेशनची आढावा बैठक झाली. या बैठकीत राज्य अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील व जिल्हाध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे, खजिनदार ढवळू फसाळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. 
Review-meeting-of-rationing-shopkeepers-at-Trimbak
यावेळी बैठकीला सर्व तालुक्याचे अध्यक्ष उपस्थित होते. बैठकीत दुकानदारांच्या अडीअडचणी समजून घेतल्या तसेच त्र्यंबकेश्वरचे पुरवठा नाय तहसीलदार यांची भेट घेऊन दुकानदारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. त्यात दुकानदारांचे दोन थम त्यांच्या कुटुंबातले ठेवावे अशी मागणी करण्यात आली आणि कमिशन बाबत चर्चा झाली. शासनाला अहवाल पाठवू असे यावेळी तहसीलदार यांनी सांगितले.

यावेळी निफाड तालुका अध्यक्ष संतोष सोनवणे अध्यक्ष, वाल्मीक लांडगोळे, गणपत नेवगे सेक्रेटरी, नारायण ठुबे 2) इगतपुरी तालुका अरुण बागडे उपाध्यक्ष, गुलाब वाजे, सीमा जाधव, अपर्णा पाटील 3)पेठ तालुका धर्मराज चौधरी अध्यक्ष, दिलीप भोये, प्रकाश शेवरे, 4) सुरगाणा तालुका ऐवाजी भोई अध्यक्ष, हरी महाले सेक्रेटरी, भास्कर चौधरी उपाध्यक्ष, मिथुन चौधरी 5) बागलाण तालुका प्रवीण सावंत अध्यक्ष, रमेश मुळे सेक्रेटरी, गुलाब जैन, किरण खैरनार, विजय घुगे 6) सिन्नर तालुका सतीश भुतडा अध्यक्ष, चंद्रकांत माळी माजी अध्यक्ष, दीपक जगताप पदाधिकारी  7) देवळा तालुका - देवा गांगुर्डे अध्यक्ष, चेतन गुंजाळ, योगेश गुंजाळ, सोमनाथ सावकार, केदा आहेर सर्वांच्या समवेत व त्रंबक तालुक्याच्या सर्व दुकानदारांच्या समवेत एकमताने कमिटीची निवड करण्यात आली. त्रंबक तालुका कमिटी लालू आचारी अध्यक्ष, राम कजबे उपाध्यक्ष, हेमंत तरवाडे सचिव, ज्ञानेश्वर मेढे उपसचिव, किसन वारघडे कार्याध्यक्ष, युवराज चव्हाण खजिनदार, गणपत जाधव संपर्कप्रमुख आदीं उपस्थित होते.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...