Skip to main content

ग्रंथ वाचनाने व्यक्तीमत्व समृध्द होण्यास मदत होते: डॉ. राजेंद्र बंगाळ

नाशिक|नियमित ग्रंथ वाचनाने व्यक्तीमत्व समृध्द होते तसेच सकारात्मक विचार वाढण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ समवेत परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही.कळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Reading-books-helps-to-enrich-personality-Registrar-Dr-Rajendra-Bangal
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी अध्यक्षस्थानावरुन सांगितले की, मराठी भाषेचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे. सर्वांनी सतत विविध प्रकारच्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. पुस्तक वाचनातून साहित्याची आवड निर्माण होते. भाषा समृध्द होण्यासाठी त्यास बळकटी मिळते. समृध्द भाषेने व्यक्तीमत्व सकस होते. भाषा समृध्द होण्यासाठी मराठी साहित्याचे नियमित वाचन होणे गरजेचे आहे. भाषा संवर्धनासाठी मराठी भाषेचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, मराठी भाषा अभिजात भाषा असून ती अमृताशी पैंजा जिंकेल असे यथार्थ वर्णण संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केले आहे. तीच मराठी माझी मातृभाषा आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. मराठी भाषेतील ग्रंथ, साहित्यसंपदा विपूल असून मराठीचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. सध्याच्या संगणक व मोबाईलच्या आभासी जगात वावराणारी तरुण व बाल अवस्थेतील पिढीने पुस्तकांचे वाचन केले पहिजे. पुस्तक वाचनातून व्यक्तीमत्वाला पैलू पडतात. लेखकांनी मांडलेले विचार व माहिती आपणांस मार्गदर्शक ठरते असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी श्री. नरहरी कळसकर यांनी सांगितले की, प्रत्येकाला वाचनाची सवय असावी. मराठी साहित्यात कथा, कादंबरी, कविता, विनोदी लेखन अशा अनेक प्रकारचे पुस्तके उपलब्ध आहेत. वाचना संस्कृतीची जोपासना सर्वांनी करावी. भेटवस्तू ऐवजी पुस्तक देण्यात यावे जेणेकरुन पुस्तकाच्या माध्यमातून वाचनाला चालना मिळेल. विद्यार्थी जीवनात वाचलेली पुस्तके आयुष्यभर प्रेरणादायी ठरतात असे त्यांनी सांगितले.

 ’जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. विद्यापीठाचे कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखाधिकारी यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे समन्वयन व सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. या कार्यक्रमात विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी गीतगायन, नाटयप्रवेश, कविता वाचन सादर केले. विद्यापीठातील अधिकारी डॉ. संजय नेरकर, श्री. प्रकाश पाटील, डॉ. स्वप्नील तोरणे, श्री. रविंद्र रांधव, श्री. एस.एस. मुलानी, श्रीमती चेतना पवार, श्री. शैलेंद्र जमधाडे, श्रीमती मीना अग्नीहोत्री यांनी पुस्तकाचे अभिवाचन, कविता, गीतांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...