Skip to main content

श्रीमन्निवृत्तीनाथ महाराज पंचक्रोशी प्रदक्षिणा सोहळ्याचे आयोजन

नाशिक|प्रतिनिधी|श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर तथा संतश्रेष्ठ विश्वगुरू श्रीमन्निवृत्तीनाथ महाराज  पंचक्रोशी प्रदक्षिणा सोहळा २०२३ ( वर्ष दुसरे ) वारकरी भूषण हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली आहे.
आशीर्वाद हरिभक्त परायण वैकुंठवासी आत्माराम बाबा नाशिककर तसेच वै . ह.भ.प.बापू बाबा देवगावकर तथा गुरुवर्य माधव बाबा घुले तसेच. ह.भ.प.रामकृष्णदास महाराज लहवितकर ह .भ .प एकनाथ महाराज गोळेसर यांच्या आशीर्वादाने शुक्रवार दिनांक २४/ २ /२३ रोजी सुरुवात होईल, निवृत्तीनाथ महाराज मंदिरात पादुकांचे पूजन होऊन आमदार हिरामण खोसकर संस्थानचे माजी अध्यक्ष, मुरलीधर पाटील .निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष, निलेश गाढवे व पंचकमिटी यांच्या हस्ते पूजन होऊन परिक्रमेला सुरुवात होईल.


२४ तारखेला सकाळी नाष्टा सुरेश गंगापूत्र यांचा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर जनार्दन स्वामी आश्रम येथे होईल दुपारी जेवण अंजनेरी भजनी मंडळ देतील दुपारचा विसावा खंबाळे रात्रीचे भोजन समस्त ग्रामस तळेगाव अंजनेरी येथे होईल 

२५ तारखेला दुसऱ्या दिवशी जातेगाव . मुळेगाव .यांचा नाश्ता होईल दुपारचे भोजन वृंदावन लॉन्स वाडीवर येथे होईल दुपारचा विसावा मुकणे येथे होईल रात्रीचे भोजन समस्त ग्रामस्थ कावनई  येथे होईल 

२६ तारखेला सकाळचा रायांबे .( सरपंच ) व कऱ्होळे ग्रामस्त याचा होईल . दुपारचे भोजन ओंडली येथे होईळ . दुपारचा विसावा नागोसली (धारगाव )   धर्मराज खोडके . रात्रीचा मुक्काम वावी हर्ष येथे होईल संदिप भोसले ( धामनी ) व समस्त ग्रामस्त वावी हर्ष महाप्रसादाचे यजमान असतील .

२७ तारखेला सकाळी वावी ते देवगाव फाटा श्री . लहानू  विठोबा गोवर्धने यांचा नाश्ता होईल दुपारचे जेवण स्वामी महाराज गोवर्धने यांच्याकडून डाळेवाडी येथे महा प्रसाद होईल . भास्कर घाट येथे दुपारचा विसावा . रामदास भाऊ नाठे यांचा, संध्याकाळी वावी हर्ष येथे महाप्रसाद होईल .

२८ तारखेला सकाळी दादाभाऊ शिरसाठ ( नाशिक ) यांचा नाष्टा होईल दुपारी ब्राह्मनवाडे येथे समस्त ग्रामस्त शिरसगाव यांच्या कडून महाप्रसाद होईल . पिप्रि त्र्यंबक येथे दुपारचा विसावा होईल . संध्याकाळी मुक्काम बेझे येथे होईल . महाप्रसादाचे यजमान . श्री .मधुकर चव्हाण . श्री . किरन नाठे हे असतील.

१ तारखेला सकाळी चक्र तीर्थ येथे नाष्टा समस्त ग्रामस्त गणेशगाव ( त्र्यंबक ) दुपारजे जेवन . व विश्रांती .समस्त ग्रामस्त पिंपळगाव गरुडेश्वर येथून कोटी तीर्थ व संध्याकाळी गणेशगाव ( नाशिक ) येथे मुक्काम व समस्त ग्रामस्त  गणेशगाव ( नाशिक ) महाप्रसाद नंतर.

२ तारखेला सकाळी बेझे फाटा येथे श्री .दतु चौधरी श्री .रामदास जाधव यांचा नाष्टा  . जानार्दन स्वामी आश्रम त्र्यंबकेश्वर येथे ह . भ .प. ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांचे काल्याच्या किर्तनाने परिक्रमेची सांगता होईल . श्री .प्रकाश गंगाधर कोठुळे विहीत गाव यांचा काल्याचा महाप्रसाद होईल . विशेष टीप .रस्त्याने चालताना काकडा . हरिपाठ . व रात्री वाटचालीचे कीर्तन होईल कोणीही व्यसन करणार नाही व्यसन केल्यास एक हजार रुपये दंड केला जाईल . अशी माहिती निवृत्ती महाराज कापसे श्री क्षेत्र त्रंबकेश्वर तथा श्रीमान निवृत्तीनाथ महाराज पंचक्रोशी प्रदक्षिणा मंडळ यांनी दिली

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...