Skip to main content

स्व.गोपीनाथ मुंडे दलित, वंचित, ओबीसींसाठी समर्पित भावनेने काम करणारे योद्धे: नितीन गडकरी

नाशिक|स्व. गोपीनाथजी मुंडे आमचे मार्गदर्शक होते. पक्षासाठी त्यांचे योगदान सर्वपरिचित आहे. महाराष्ट्रात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दलित, वंचित यांना भारतीय जनता पक्षात आणण्याचे श्रेय सर्वतोपरी गोपीनाथ मुंडे यांना जाते. कार्यकर्त्यांसाठी, पक्षासाठी जीवाची बाजी लावणारे असे व्यक्तिमत्व होते‌.  महाराष्ट्रातील दलित, वंचित, शोषित-पिडीत, आदिवासी, ओबीसी यांच्यासाठी समर्पित भावनेने कार्य करणारे योद्धे होते, असे प्रतिपादन केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
Gopinath-Munde-a-dedicated-warrior-for-Dalits-obcsunderprivileged-Nitin Gadkari
नाशिक जिल्ह्यातील नांदूर-शिंगोटे, येथे उभारण्यात आलेल्या स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मारकाचे  व पूर्णाकृती पुतळ्याचे आज लोकार्पण केंद्रिय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार, राज्याचे मंत्री श्री दादा भुसे, श्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे जी, खासदार प्रीतम मुंडे, खा. हेमंत गोडसे, ॲड.माणिकराव कोकाटे, आ. हिरामण खोसकर, आ. देवयानी फरांदे, आ.नरेंद्र दराडे, मा. आमदार राजाभाऊ वाजे, माजी आ. डॉ.सुधीर तांबे, ॲड.हेमंत धात्रक, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शीतल सांगळे, कार्यक्रमाचे आयोजक उदय सांगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

स्व गोपीनाथ मुंडे लोकनेते बिरुदाचे मुकुटमणी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

राज्यात अनेक लोकनेते झाले त्यांनी चांगले कार्य केले पण गोपीनाथ मुंडे हे लोकनेते बिरुदाचे मुकुटमणी होते असे गौरवद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. ते पुढे म्हणाले, गोपीनाथ मुंडे हे परखड बोलत व सामन्यासाठी आवाज उठवत होते, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी त्यांनी सतत संघर्ष केला. ७० चा दशकात फिरण्यासाठी वाहनं नव्हती तेव्हा त्यांनी सायकलवर फिरून पक्ष गावोगावी पोहचवला याचे श्रेय मुंडे यांना जाते असे सांगितले.

ओबीसी, वंचित घटकांसाठीचे त्यांचे कार्य शेवटच्या श्वासार्यंत सुरू ठेवू: भुजबळ

लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसीसह समाजातील वंचित घटकांसाठी सुरू केलेलं काम शेवटचा श्वास असेपर्यंत सुरू ठेवणार अशी ग्वाही माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. स्व.गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातील ओबीसीसह पीडित सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांनी सुरू केल्याल्या कामाची सर्व जबाबदारी आता माझ्यावर आणि तुमच्यावर आहे. त्यामुळे शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांचं काम सुरू ठेवू असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मारकाचे  व पूर्णाकृती पुतळ्याचे आज लोकार्पण सोहळ्यासाठी राज्यभरातून मुंडे यांच्यावर प्रेम करणारी सामन्यजनता, कार्यकर्ते विविध क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत कल्पक आणि सुंदर अशा स्मारक निर्मितीसाठी अनेकांनी परिश्रम घेतले त्यात स्मारक समितीचे आयोजक उदय सांगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली. 




Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...