Skip to main content

वाढता स्क्रीनटाईम सर्वांनाच धोकेदायक: बालरोगतज्ज्ञ डॉ. संपदा तांबोळकर

नाशिक| दिअँकर नेटवर्क|वाढता स्क्रीन टाईम सर्वांनाच धोकेदायक असल्याचे प्रतिपादन बालरोगतज्ज्ञ डॉ. संपदा तांबोळकर यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) समवेत पुणे येथील डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या प्राध्यापिका, बालरोगतज्ज्ञ डॉ. संपदा तांबोळकर प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित होत्या.   
Increasing-screen-time-is-dangerous-for-everyone-Pediatrician-Dr-Tambolkar
या कार्यक्रमास व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही. कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे, मतनिसच्या अध्यक्षा श्रीमती योगिता पाटील, सचिव श्रीमती शिल्पा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी समृध्द पालकत्व विषयावर मार्गदर्शन करतांना डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या प्राध्यापिका व बालरोगतज्ज्ञ डॉ. संपदा तांबोळकर यांनी सांगितले की, महिलांनी कुटुंबाची काळजी घेतांना मुलांवर अधिक लक्ष केंद्रीत केले पाहिजे. सध्या मोबाईलचा वाढता वापर सर्वांनाच घातक ठरणारा आहे. विशेषतः लहान मुलांच्या बुध्दीमत्तेवर आणि मानसिकतेवर घातक परिणाम करत आहे. याकरीता सर्वांनी स्क्रीन टाईम कमी करणे आवश्यक आहे. विशेषतः पालकांनी याबाबत अधिक जागरुक राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

त्या पुढे म्हणाल्या की, मुलांना संतुलीत आहार गरजेचा असून त्यासाठी रोजच्या स्वयंपाकात विविध जीवनसत्व, प्रथिन व कार्बोहाड्रेटस् असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. पॅकिंग फुट खाणे शक्य झाल्यास टाळावे. तरुण वयात येणाÚया मुलांची व मुलींची मानसिकता पालकांनी ओळखणे गरजचे आहे. या वयात वाईट व्यसनं लागण्याची शक्यता अधिक असते. यासाठी मुलांसमवेत दररोज काही वेळ घालवावा अन्य विषयांवर चर्चा करावी. सामाजिक बांधिलकी, आज्ञाधारपणा व वक्तशीरपणा यांचे रोपण करावे तर पुढील पिढी वरिष्ठांचा आदर करेल. यासाठी घरातील महिलानांनी अधिक सजग व दक्ष राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) सांगितले की, समाजाला पुढे नेण्यासाठी स्त्री शिक्षणाबरोबर त्यांचा सन्मान झाला पाहिजे. ’संशोधन तंत्रज्ञान याचा उपयोग लिंगभाव समानतेसाठी’ असा या वर्षाच्या जागतिक महिला दिनाची थीम आहे. या अनुषंगाने महिलांनी टेक्नॉलॉजी अणि ऑनलाईन क्षेत्रात मोठी भरारी घ्यावी असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, आरोग्य क्षेत्राबरोबर अवकाश संशोधन, तंत्रज्ञान, औषध, कला व उद्योग आदी क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली आहे, असे सांगितले. याप्रसंगी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, थोर स्त्रियांचे विचार, चरित्र कायम स्मरणात ठेवा व त्यानुसार वागा. वाचन, लेखन आदी छंद जोपासून नेहमी आनंदी रहा. कोणत्याही क्षेत्रात काम करत असलात तरी आपल्या कामाचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे असा चांगला ठसा उमटवा असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही.कळसकर यांनी सांगितले की, समाजातील मुली व महिलांचा सन्मान प्रत्येकाने करावा. महिला दिन साजरा करण्याची ही संकल्पना चूकीची नाही मात्र दररोज त्यांचा सन्मान झाल्यास महिला दिन नावाने वेगळा दिवसही साजरा करण्याची गरज भासणार नाही. असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मतनिसच्या अध्यक्षा श्रीमती योगिता पाटील यांनी केले. प्रमुख व्याख्यात्या यांचा परिचय श्रीमती रंजिता देशमुख यांनी करुन दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शिल्पा पवार यांनी तसेच श्रीमती उज्वला साळुंखे यांनी आभार मानले. महिला दिनानिमित्त विद्यापीठात रांगोळी स्पर्धा व मॉकटेल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धेत श्रीमती आशा वाबळे यांनी प्रथम व श्रीमती शितल शिंदे यांना व्दितीय आाणि श्रीमती ज्योती इटणकर यांनी उपविजेता म्हणून बक्षिस मिळविले. मॉकटेल स्पर्धेत विविध पदार्थापासून हेल्थी ज्यूस तयार करण्यात आले होत यास्पर्धेत श्रीमती कांचन सानप यांनी प्रथम श्रीमती ज्योती कर्नाटकम् यांनी व्दितीय आणि श्रीमती लीना आहिरे यांनी उपविजेता म्हणून बक्षिस मिळाले. श्रीमती शोभना भिडे, श्रीमती शिल्पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात आले. याकरीता श्रीमती रंजिता देशमुख, श्री. प्रविण घाटेकर,  श्री. सुरेश शिंदे, श्रीमती उज्वला साळुंखे, शैलजा देसाई यांनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...