Skip to main content

उद्योजकांसाठी नाशिकमध्ये पहिल्यांदाच ‘ऑटो अँड लॉजीस्टिक समिट'

नाशिक| नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने ऑल व्हील डिस्प्ले संकल्पनेतून नाशिक शहरात पहिल्यांदाच ऑटो अँड लॉजीस्टिक एक्स्पोचे आयोजन करण्यात येत आहे. या एक्स्पोच्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि.१८ मार्च २०२३ रोजी सकाळी १० वाजता नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर सभागृहात ‘ऑटो अँड लॉजीस्टिक समिट’चे आयोजन करण्यात आले आहे. या समिटमध्ये नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने ‘सारथी सुविधा केंद्र’ या मॉडेलचे सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र फड यांनी दिली आहे.
The-presence-of-Union-Minister-Nitin-Gadkari-for-the-first-time-in-Nashik-auto-and-Logistics-Summit-for-entrepreneurs
राजेंद्र फड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन "ऑल व्हील्स डिस्प्ले" या संकल्पनेखाली भव्य ऑटो अँड  लॉजिस्टिक एक्स्पोचे आयोजन नाशिक शहरात  करत आहे. सदर एक्स्पोच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील सर्व घटकांना एकत्र आणत या क्षेत्रासाठी महत्वाचा घटक असलेल्या चालकांसाठी सर्व सुविधायुक्त रेस्ट रूम (सारथी सुविधा केंद्र) उभारण्याचा संस्थेचा उद्देश आहे. यासाठी प्राथमिक स्वरुपात नाशिकच्या आडगाव ट्रक टर्मिनलचा विकास करण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी संस्थेच्या वतीने अद्यावत "सारथी सुविधा केंद्राचे" मॉडेल विकसित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, एक्स्पोचा मुख्य उद्देश साध्य होण्यासाठी देशाच्या प्रगतीमध्ये महत्वाचे योगदान असलेल्या ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील सर्व घटकांना समिटच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा मानस आहे. दळणवळण क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्याने ट्रान्सपोर्ट क्षेत्र अतिशय गतिशील पद्धतीने बदलत आहे. त्यामध्ये ट्रान्सपोर्ट क्षेत्राला असलेल्या नाविन्यपूर्ण संधी व तंत्रज्ञान त्या अनुषंगाने ट्रान्स्पोर्टर व्यावसायिकानी करावयाचे बदल याबाबत साधकबाधक चर्चा करण्यासाठी सदर समीटचे आयोजन करण्यात येत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या समिटच्या माध्यमातून उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहे. तसेच यावेळी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या ‘सारथी सुविधा केंद्राच्या मॉडेल’चे सादरीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष राजेंद्र फड यांनी दिली आहे.

*उद्योजकांच्या मागणीनुसार एक्स्पोच्या तारखांमध्ये बदल*
उद्योजकांच्या दृष्टीने मार्च एंडची कामे अधिक असल्याने एक्स्पोमध्ये उद्योजकांना सहभागी होण्यास अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सदर एक्स्पोच्या तारखांमध्ये बदल करण्यात यावा अशी मागणी उद्योजकांकडून करण्यात आली. त्यानुसार १७, १८ व १९ मार्च २०२३ रोजी होणारा ऑटो अँड  लॉजिस्टिक एक्स्पो आता मे महिन्यात २५ ते २८ मे २०२३ दरम्यान आता तीन ऐवजी चार दिवस आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली असून उद्योजकांनी आणि नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...