Skip to main content

Posts

Showing posts from February, 2024

शहरात ३ मार्च रोजी पल्स पोलिओ मोहीम

नाशिक|राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत नाशिक महानगरपालिकेत आज  रोजीआयुक्त तथा प्रशासक अशोक करंजकर  यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयात सिटी टास्क फोर्सची सभा आयोजित करण्यात आलेली होती. दि . ३ मार्च २०२४ रोजी नाशिक शहरातील  २ लाख १२६  लाभार्थी बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे.   नाशिक  शहरात यासाठी  ८७६ बूथ असणार आहे  ६५ ट्रान्झिट टीम असणार आहे तर ४२ मोबाईल टीम असणार आहे.असे एकूण ९८३ बूथ असणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले. त्यानुसार महाराष्ट्रात १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दर वर्षी राबविण्यात येत आहे. यामध्ये पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओची लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात येते.गेली २५ वर्षे सातत्याने पोलिओ निर्मूलनाकरिता सर्व जण योगदान देत आहे. भारतात १३ जानेवारी २०११ नंतर आजतागायत एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे भारताला पोलिओ निर्मूलनाचे प्रमाणपत्र मार्च-२०१४ मध्ये मिळाले आहे.  दरम्यान पोलिओच्या समूळ उच्चाटनाच्या अनुषंगाने नेहमीप्रमाणे विशेष प...

रेल्वे प्रकल्पांसाठी महाराष्ट्राला १५ हजार ५०० कोटी: रावसाहेब दानवे

नाशिकरोड|प्रतिनिधी| नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याअगोदर काँग्रेसच्या ६२ वर्षांच्या कालखंडात २००९ सालापर्यंत केंद्राकडून महाराष्ट्राला अवघा ११ कोटींच्या आत निधी मिळत होता. अवघ्या नऊ वर्षात पंतप्रधान मोदींनी हा आकडा तब्बल ५ हजार ५०० कोटी इतक्या उच्चांकावर नेला. रेल्वेच्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी पायाभूत सुविधा नाशिक येथे उपलब्ध असून पुढील काळात अजूनही काही महत्त्वाचे प्रकल्प नाशिक येथे येणार असल्याचे संकेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे. खा. हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्यातून एकलहरे येथे उभारलेल्या रेल्वे व्हिल कारखान्याचे सोमवारी (ता.२६) उद्घाटन केल्यानंतर मंत्री दानवे बोलत होते. व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, ज‍िल्हाध्यक्ष सुनिल आडके, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गणेश कदम, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रविण तिदमे, मुख्य कारखाना व्यवस्थापक अलोक शर्मा, आयमाचे धनंजय बेळे, नगरसेविका जयश्री खर्जुल, नितीन खर्जुल, शिवाजी गांगुर्डे, रमेश धोंगडे, पंड‍ित आवारे, बाजीराव भागवत, हर‍िष भडांगे, रेल्वे प्रशासनाचे नरेशपाल सिंग, अनंत सदाशिव, इ...

फरार सराईत गुन्हेगारांना दिल्लीत अटक

नाशिकरोड| प्रतिनिधी| उपनगर येथील गंभीर गुन्ह्यातील फरार बहेनवाल गॅंगच्या म्होरक्यासह अन्य तीन जणांना गुंडा विरोधी पथकाने दिल्लीत जाऊन शिताफीने अटक केली. पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, डी. के. पवार, राजेश सावकार, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, गणेश नागरे, नितीन गौतम, निवृत्ती माली, सुवर्ण गायकवाड यांनी ही कामगिरी केली. जेलरोडच्या भीमनगर येथेली धर्मनाथ अपार्टमेंटसमोर फिर्यादी मयूर रोहम हे १६ फेब्रुवारीला थांबले होते. या वेळी पांढ-या कारमधून विजय बहेनवाल उर्फ छंगा, राहुल उज्जैनवाल, गणेश सोनवणे व त्यांच्या साथीदारांनी रोहम यांना पकडले. मागील भांडणाची कुरापत काढून मयूर बेद व रोहित महाले यांच्याविषयी चौकशी सुरु केली. नंतर रोहम यांना मारहाण करून शस्त्राने वार केले. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होते. हे आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्या शोधासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त सीताराम कोल्हे यांनी गुंडा विरोधी पथकाला कारवाईच्या सूचना केल्या होत्या. या पथकाला विजय...

मनपात संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

नाशिक|मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.  यावेळी कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त डॉ.विजयकुमार मुंडे, नितीन नेर, मुख्य लेखाअधिकारी दत्तात्रय पाथरुट, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड, अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर, नितीन पाटील, गणेश मैंड, राजेंद्र शिंदे,आयुक्त यांचे स्वीय सचिव वाल्मीक ठाकरे, सहाय्यक अधिक्षक रमेश बहिरम, सहाय्यक नगरसचिव किशोर कोठावळे, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, अजय कमोद, नितीन गंभीरे, जगदीश देशमुख, संजय पटेल,जयश्री गांगुर्डे, सोनल पवार,चैताली वलवे,  कृष्णा पडोळ, मंगेश नवले, संतोष कान्हे,सागर पिठे, वीरसिंग कामे, पंकज सोनवणे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

विकसित भारतासाठी शिक्षण आणि आरोग्य महत्वपूर्ण: कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस

नाशिक|प्रतिनिधी| विकसित भारतासाठी शिक्षण आणि आरोग्य महत्वपूर्ण असल्याचे  प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी आरोग्य विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाप्रसंगी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा तेविसावा दीक्षांत समांरभात विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. रमेश बैस अध्यक्षस्थानी ऑनलाईन उपस्थित होते.  या समारंभास व्यासपीठावर विद्यापीठाचे मा. प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा.नामदार श्री. हसन मुश्रीफ प्रमुख अतिथी म्हणून व सन्माननीय अतिथी म्हणून बेळगांवचे के.एल.ई. अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्चचे मा. कुलगुरु डॉ. नितीन गंगने, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे प्रधान सचिव श्री. दिनेश वाघमारे, मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प., डॉ. ख्रिस्तोफर डिसूजा, मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परिक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही. कळसकर, विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विठ्ठल धडके, डॉ. विभा हेगडे, ड...