Skip to main content

फडणवीस अन् मनकवडे मोदी?

फडणवीस अन् मनकवडे मोदी?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दुसऱ्या टप्प्यात येऊन पोहचली आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांचा प्रचार सभांचा धडाका सुरू असून आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळे येथून महाराष्ट्राच्या प्रचाराचा श्रीगणेशा करून निवडणुकीची रंगत वाढवली आहे. धुळ्याच्या सभेत मोदी यांनी महाविकास आघाडीवर शरसंधान साधले. विकासासाठी केंद्रात सत्ता दिली तशी महाराष्ट्रात ही भाजपा महायुतीला द्या, आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या मनातील इच्छा  पूर्ण करू असे जनतेला आश्वासन दिले. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील प्रचारादरम्यान अमित शहा यांनीही पंतप्रधानाच्या आश्वासनाची री-ओढत याचा पूनर्रउच्चार केला. अन् फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे सूतोवाच असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले गेलेे. 

मोदी-शहा यांनी महाराष्ट्रात येऊन असे संकेत दिले, त्याला अनेक घडामोडींची पार्श्वभूमी आहे. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होता होता फडणवीस यांना अचानक उपमुख्यमंत्री व्हावे लागले, ते तयार नव्हते पण सरकारवरील पक्षांची पकड राहावी यासाठी शहा यांनी काढलेल्या समजुतीनंतर उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्यास राजी झाल्याचे बोलले जाते. फडणवीस यांची हीच नाराजी दूर करण्याचा कदाचित प्रयत्न असावा. सध्या तरी महाराष्ट्रातील कार्यकर्ते, नेते यांचे मोहोळ असलेला फडणवीस यांचा सारखा दुसरा नेता नाही. चाणाक्ष आणि अभ्यासू ही आहेत. महाराष्ट्रातील राजकारणावर चांगली पकड आहे. 

म्हणून निवडणुकीनंतर ज्यांच्या जागा जास्त असतील त्याचा मुख्यमंत्री होईल असे शहा बोलत असले तरी भाजपाचा मुख्यमंत्री असावा यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावून तुम्हाला मुख्यमंत्री बनवण्यामागे भाजपा आमदारांचा मोठा त्याग असल्याचे सांगावे लागले, एक प्रकारे शिंदे यांना अप्रत्यक्षपणे त्यांनी यंदा भाजपचाच मुख्यमंत्री असेल याचा सूचक इशारा ही दिला. त्यासाठी संघ आणि भाजपचे कार्यकर्ते झटून कामाला लागल्याचे दिसत आहे. लोकसभेत संघाने प्रचारात भाग न घेतल्याने त्याचा फटका ही भाजपाला बसला. त्यामुळे भाजपा आता ताक ही फुंकून पेत आहे. संघ आणि कार्यकर्त्यांच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आहे.

२०१९ विधानसभा निवडणूकीत १०५ जागा आणि सर्वाधिक ३७ टक्के मते भाजपाला होती, त्यामुळे भाजपची रणनीती त्यादृष्टीने सुरू आहे. फडणवीस यांची मन की बात शहा- मोदी यांनी हेरली असून कदाचित मनकवडे मोदी यांनी फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छापूर्ण करण्यासाठी जनतेला भाजपा महायुतीचे सरकार सत्तेवर आणण्याचे आवाहन केले असावे. त्यात त्यांना कितपत यश मिळते हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...