Skip to main content

मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

कुणाला कोणते खाते मिळाले ते वाचा 

मुंबई| दिअँकर वृत्तसेवा| राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाकडे गृह विभाग कायम असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे  अर्थ खाते देण्यात आले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे यांना नगर विकास, गृह निर्माण खात्याची जबाबदारी मिळाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे  यांना महसूल तर राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास) खाते मिळाले आहे.

तसेच इतर मंत्रिमंडळ खातेवाटप पुढीलप्रमाणे आहे.

हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण
चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा
गणेश नाईक - वन
दादाजी भुसे - शालेय शिक्षण
संजय राठोड - माती व पाणी परीक्षण
धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा
जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल
पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर
अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय
17. शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18. आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान
19. दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20. अदिती तटकरे - महिला व बालविकास
21. शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम
22. माणिकराव कोकाटे - कृषी
23. जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज
24. नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन
25. संजय सावकारे - कापड
26. संजय शिरसाट - सामाजिक न्याय
27. प्रताप सरनाईक - वाहतूक
28. भरत गोगावले रोजगार हमी, फलोत्पादन
29. मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन
30. नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे
31. आकाश फुंडकर - कामगार
32. बाबासाहेब पाटील - सहकार
33. प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, राज्यमंत्री
34. माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
35. आशिष जयस्वाल अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
36. मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
37. इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन योगेश कदम - गृहराज्य शहर
38. पंकज भोयर - गृहनिर्माण.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...