Skip to main content

श्री कपालेश्वर मंदिर मूल्यांकनाचे काम पूर्ण; ४.७३ लाखाच्या वस्तू

नाशिक|दिअँकर वृत्तसेवा|संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर येथे भाविकांनी केलेल्या धातूच्या वस्तूंचे मूल्यांकन  नुकतेच करण्यात आले त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाला असून, संस्थानकडे सोन्याच्या वस्तूंचे मूल्यांकन ९८ हजार ८०० रू. तर चांदीच्या वस्तू मूल्यांकन ३ लाख ७२ हजार २१५ इतके आले आहे. 


संस्थानचे अधिकृत मूल्यांकनकर्ता चेतन राजापुरकर यांच्यामार्फत करण्यात आले.  राजापुरकर यांनी कपालेश्वर चरणी मानद सेवा दिली. नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात आल्यापासून संस्थानने भाविकांसाठी पारदर्शक कारभार करण्याकडे भर दिलेला आहे. श्रीकपालेश्वर मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदा भाविकांनी दिलेल्या वस्तूंचे मूल्यांकन झाल्याने संस्थानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मूल्यांकन करताना  संस्थानचे अध्यक्ष ॲड. अक्षय कलंत्री, खजिनदार सी.ए. श्रीकांत राठी, विश्वस्त मंडलेश्वर काळे, श्रद्धा दुसाने (कोतवाल), रावसाहेब कोशिरे आदी उपस्थित होते.




वैशिष्ट्ये पूर्ण दागिन्यांचा समावेश

श्री कपालेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट यांच्या ताब्यातील सोने व चांदी दागिन्यांचे मूल्यांकनाचे काम कॅमेऱ्याच्या निगराणी खाली आम्ही ट्रस्टचे अधिकृत व्हॅल्यूअर म्हणून पूर्ण केले.  मूल्यांकन अहवाल ट्रस्ट कडे सोपावलेला आहे. मूल्यांकन  दागिन्यांमध्ये काही वैशिष्ट्ये पूर्ण दागिने बघायला मिळाले  यात नवसपूर्ती निमित्ताने दिलेले  विविध सोने व चांदी वस्तू जसे घराची चांदीची प्रतिकृती , चांदीचे पाळणे तसेच बेलपान हार , बेलपान , त्रिशूल इत्यादी दागिने मोठ्याप्रमाणात बघायला मिळाल्यात. तसेच मंदिरातील गुरव यांच्या ताब्यातील प्राचीन दुर्मिळ देवाचे दागदागिने उपलब्ध न झाल्याने त्याचे व्हॅल्यूशन करता आलेले नाही.

-चेतन राजापूरकर
गव्हर्नमेंट अप्रुड व्हॅल्यूअर

संस्थानतर्फे इतिहासात पहिल्यांदा कपालेश्वर महादेवाच्या भाविकांनी दिलेल्या वस्तूंचे मूल्यांकन करण्यात आले. भाविकांनी व संस्थानने कपालेश्वर महादेवांच्या शृंगारासाठी गुरवांकडे दिलेल्या वस्तू मूल्यांकन  करणेकामी संस्थानमध्ये हजर करण्याबाबत सर्व ५ गुरव परिवारांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे. परंतु अद्याप त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. सदरच्या वस्तू मूल्यांकन करणेकामी हजर न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

ॲड. अक्षय कलंत्री, अध्यक्ष , संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...