Skip to main content

जिल्हा परिषदेच्या सभापती अश्विनी आहेर आणि वास्तुविशारद गौरव आज लग्नाच्या बेडीत अडकले; विवाह सोहळ्यात मान्यवर आणि आप्तेष्टांचा फेसबुक लाईव्हद्वारे सहभाग

नाशिक/ प्रतिनिधी: जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मा. आ. अनिल आहेर यांची कन्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर आणि वास्तुविशारद गौरव यांचा विवाह सोहळा आज फेसबुक लाईव्हव्दारे पार पडला. अनोख्या पद्धतीने पार पडलेल्या सोहळ्यात नवदाम्पत्याला मान्यवर आणि आप्तेष्टांनी फेसबुकवर ऑनलाईन उपस्थिती दर्शवून आशिर्वाद आणि शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याने समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला.
Covid-19-corona-virus
फोटो: उदय रांजणगावकर
कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे गर्दी होईल अशा कुठल्याच कार्यक्रमाला परवानगी नाही. लग्न कार्यात गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे  मोजकेच नातेवाईक, हितचिंतकांच्या उपस्थित लग्न सोहळे पार पडत आहे. असाच एक लग्न सोहळा ज्याने आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवले. माजी आ. अनिल आहेर यांची कन्या चि.सौ.का.अश्विनी(सभापती-महिला व बालकल्याण विभाग जि.प.नाशिक,सदस्य-नाशिक जिल्हा नियोजन समिती (M.Arch) आणि चि.गौरव(M.Arch) यांचा विवाह सोहळा आज २४ मे २०२० रविवार रोजी फेसबुक लाईव्ह याच्या माध्यमातून संपन्न झाला.

मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात सोशल डीस्टन्स नियमांचे पालन करण्यात आले. तसेच  मास्क घालून वऱ्हाडी सहभागी झाले. उर्वरित मान्यवरांनी फेसबुक_लाईव्हद्वारे सहभागी होऊन नवदाम्पत्याला ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवून अश्विनी आणि गौरव यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.ऑनलाईन सहभागी झालेल्या सर्वांचे याप्रसंगी समस्त आहेर परिवार(नायडोंगर) यांनी आभार मानले. आणि समाजात जनजागृती व्हावी आणि एक आदर्श निर्माण  व्हावा यासाठी नवा पायंडा घालून दिला.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...