Skip to main content

डिझेलची दरवाढ ट्रान्सपोर्ट व्यवसायाच्या मूळावर; दरवाढ मागे घ्या अन्यथा आंदोलन: ट्रान्सपोर्ट असोसिएशन

नाशिक|प्रतिनिधी| डिझेलच्या दरात दिवसेंदिवस होत असलेली वाढ अत्यंत चिंताजनक असून अगोदरच अडचणीत सापडलेला ट्रान्सपोर्ट व्यवसाय अधिक अडचणीत सापडला असून डीझेलची दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व नाशिक गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी.एम.सैनी यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. 
Fad-saini-trandports-asociation
फोटो:फाईल
तसेच येत्या १ जुलै २०२० डीझलदर वाढीचा निषेध म्हणून एक दिवसीय निषेध म्हणून काळया पट्या बांधून काम करणार येईल जर काही निर्णय होत नसेल आणि भाव वाढ माघे घेतली नाही तर प्रसंगी आंदोलन करू असा इशारा दिला आहे. नाशिक ट्रान्सपोर्ट व गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, देशात आणि राज्यात कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतांना उद्योग, व्यवसाय व सामान्य नागरिकांचे अर्थचक्र  पूर्णपणे कोलमडले आहे. आशा परिस्थितीत गेल्या वीस दिवसाहुन अधिक काळापासून डिझेलच्या दरात सातत्याने दरवाढ होत असून डिझेल दरवाढीने ऐतिहासिक उंची गाठली आहे. याचा सर्वात मोठा परिमाण म्हणजेसंपूर्ण देशातील ट्रान्सपोर्ट व्यवसाय अडचणीत सापडला आहे. 
Rajendra-fad
राजेंद्र फड, अध्यक्ष नाशिक ट्रान्सपोर्ट असो.
सातत्याने डिझेलमध्ये दरवाढ होत असल्याने वाहतूक खर्च अधिक वाढत आहे. त्याचा वस्तूच्या किमतीवर होत असून महागाई अधिक वाढून नागरिक देखील अडचणीत येणार आहे. एकतर अगोदरच कोरोनाच्या संकटाने अनेकांच्या उपजीविकेवर परिणाम होत असून त्यात महागाईची झळ बसल्यास उद्योग व्यवसाया सोबतच नागरिकांच्या रोषाला शासनाला सामोरे जावे लागणार आहे.बऱ्याच वेळा आम्ही कळविले आहे की वाहतूक दारांचे व कारखान्यांचे,इतर माल वाहतूक कंत्राट हे वार्षिक केलेले असते त्या साठी तीन ते चार महिन्यात नियोजित दर वाढ असेल तर आगोदर आम्हाला कारखान्यांना कंत्राट नियम अटी मध्ये टाकता येते परंतु रोजच दरवाढ होत असेल तर ते त्वरित थांबवावे असे म्हटले आहे.

देशातील ट्रान्सपोर्ट व्यवसाय एकीकडे अनेक अडचणींचा सामना करत असतांना दिवसेंदिवस त्या अडचणी कमी होण्यापेक्षा त्या वाढतच चालल्या आहे. मात्र शासनाला याबाबत कुठलही सोयर सुतक नसल्याचे दिसत आहे. देशातील ट्रान्सपोर्ट व्यवसायातील अडीअडचणी बाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा होऊन देखील शासन जर त्याकडे दुर्लक्ष करणार असेल तर वाहतुकदारांना रस्त्यावर उतरण्याशिवाय कुठलाही पर्याय खुला राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने अडचणीत सापडलेल्या या व्यवसायाला वाचविण्यासाठी आणि नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने डिझेल दरवाढ तातडीने मागे घेऊन दिलासा द्यावा अशी मागणी ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष राजेंद्र फड व पी.एम.सैनी यांनी केली आहे.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...