Skip to main content

'सच ऍप' प्रणालीद्वारे कोविड रुग्ण शोधण्यास आणि उपचारास मदत: झेडपी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर

नाशिक| 'सच ऍपद्वारे' शारिरीक दृष्ट्या दुर्धर तथा इतर आजाराने बाधित असलेले आणि कोविड बाधीत रुग्ण तत्काळ शोधण्यास आणि उपचार करण्यास मदत होणार आहे. भविष्यात कोविड आजारावर मात करण्यासाठी सदर "सच  ऍप" प्रणालीचा चांगला उपयोग होणार आहे असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना. बाळासाहेब क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
Zp-president
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील आढावा सभेप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना. बाळासाहेब क्षिरसागर यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड, जिल्हा परिषद सदस्य श्री.निलेश केदार, श्रीमती सीमंतिनी कोकाटे,पंचायत समिती सभापती सौ.शोभाताई बरके, उपसभापती श्री.संग्राम कातकाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता बाल व संगोपन अधिकारी डॉ. चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन बच्छाव, गटविकास अधिकारी डॉ.लता गायकवाड, ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. निर्मला गायकवाड, पंचायत समिती सदस्य श्री.जगन भाबड, सौ.संगीता पावसे, श्री.भगवान पथवे, सौ. सुमन बर्डे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना प्रादुर्भावा संदर्भात लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात कोविड समस्या व त्यावर करावयाची उपाययोजना यासंदर्भात चर्चा करण्यात आली. कोरोना हे देशावरील संकट असल्याने सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याची भूमिका जिल्हा परिषद अध्यक्ष ना. श्री. बाळासाहेब क्षिरसागर यांनी मांडली. 
सिन्नर तालुक्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असतांना पन्नास टक्के कमी कर्मचारी असतांनाही जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी, तालुक्याचे आरोग्य अधिकारी कर्मचारी स्वतःला सांभाळून जनतेला चांगल्या प्रकारे आरोग्यसेवा देत असल्याबद्दल आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन व आभार जिल्हा परिषद सदस्य श्री. निलेश केदार यांनी मानले.
कोविड रुग्ण तात्काळ शोधणे व  उपचार करणे यासाठी  "सच प्रणाली" नामक ऑनलाईन ऍपचे उदघाटन नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना. श्री. बाळासाहेब क्षिरसागर याचे हस्ते करण्यात आले."सदर ऍपद्वारे विविध आजाराने बाधित रुग्णास किंवा  कोविड बाधित असलेल्या रुग्णाना धोका जास्त ओळखून लागलीच अशा रुग्णांना विशेष आरोग्य सेवा तात्काळ उपलब्ध करुन देण्यास मदत होणार आहे. सदरच्या "सच ऍप" प्रणाली सिन्नर तालुक्यात प्रायोगिक तत्वावर वापर सुरु करण्यात आली आहे. "सच ऍपचा" अनुभव लक्षात घेऊन संपूर्ण नाशिक जिल्ह्यात "सच ऍपचा" वापर जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात येणार आहे.
सदर "सच ऍप" विकसित करण्यासाठी नाशिक जिल्ह्याची अग्रणी बँक- बँक ऑफ महाराष्ट्राने त्यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमाअंतर्गत निधी उपलब्ध करुन दिला आहे. कोविड विरोधी मोहिमेत सामाजिक बांधिलकी म्हणुन बँक ऑफ महाराष्ट्र यांनी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्राचे विशेष अभिनंदन नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी श्रीमती लीना बनसोड यांनी केले.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...