मुंबई| महाराष्ट्र राज्यात सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने सुधारत असून आता तो 65 टक्के इतका झाला आहे. हा दर राष्ट्राची सरासरी दराच्या म्हणजेच 66 टक्क्यांच्या जवळ पोहचला आहे. राज्यात 4.57 लाख रुग्णांपैकी 2.99 लाख रुग्ण बरे झाले असून 1.42 लाख सक्रिय रुग्ण आहेत.
![]() |
फोटो:फाईल |
मुंबईला पूर्वपदावर आणण्यासाठी महापालिकेने महत्वपूर्ण निर्णय घेत लॉक डाऊनच्या नियमांना काही प्रमाणात शिथिल करत शहरातील व्यापार आजपासून काही प्रमाणात सुरू करण्याची परवानगी दिली आहे. शहरातील सम-विषम नियम रद्द करण्यात आला असून मॉल्स सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.