Skip to main content

ओमिक्रॉनला रोखण्यासाठी राज्यात नवे निर्बंध

मुंबई| ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोविड– 19 च्या प्रसाराची भीती राज्य मनात निर्माण झाली आहे, याची दखल घिऊन महाराष्ट्र शासनाने या विषाणूला रोखण्यासाठी काही तातडीची पावले उचलण्याचे ठरविले आहे. त्यानुसार खाली दिलेले निर्बंध व नियम 10 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होतील, असे राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. 
New-restrictions-in-the-state-to-prevent-Omicron
 
क्षेत्रप्रस्तावित निर्बंधनागरीकांचे बाहेर फिरणे1. पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला बाहेर फिरण्यासाठी पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत बंदी.

2. पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यासाठी रात्री 11 पर्यंत ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंदी.

शासकीय कार्यालये
1.     महत्त्वाच्या कामासाठी कार्यालय प्रमुखाच्या लेखी परवानगीविना आगंतुकांवर बंदी.

2.     कार्यालय प्रमुखांनी नागरीकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेची व्यवस्था करावी.

3.     बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीची व्यवस्था

4.     कार्यालय प्रमुखांच्या गरजेनुसार वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कार्यालयीन वेळेत कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे तसेच गरजेनुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करणे. याकरिता कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या वेळांमध्ये बदलाचाही विचार करू शकतील.

5.     कार्यालय प्रमुखांनी कोविडरोधी वागणुकीचे काटेकोर पालन केले जाईल, याची काळजी घ्यावी.

6.     कार्यालय प्रमुखांनी थर्मल स्कॅनर्स, हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत.

खासगी कार्यालये1.     कार्यालय व्यवस्थापनाने वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कामकाजाच्या वेळा कमी कराव्यात. कार्यालयात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत, याचीही दक्षता घ्यावी तसेच कर्मचाऱ्यांसाठी वेळांमध्ये बदल करण्याचाही विचार करतील. तसेच कार्यालये 24 तास सुरू ठेवून टप्प्याटप्प्याने काम करण्याबाबतही विचार करावा.

कार्यालयीन कामकाजाच्या वेळा असामान्य असतील आणि त्यासाठी प्रवास करणे अत्यावश्यक असेल तर अत्यावश्यक कामासाठी ओळखपत्र दाखवून परवानगी मिळवता येऊ शकेल. अशाप्रकारचा निर्णय घेताना महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि सोयीचा विचार करणे बंधनकारक राहील.

2.     लसीकरण पूर्ण केलेले कर्मचारीच कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. लसीकरण पूर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन द्यायलाच हवे.

3.     कार्यालय व्यवस्थापनाने सर्व कर्मचारी सर्वकाळ कोविडरोधी वागणुकीचे तंतोतंत पालन करतील याची दक्षता घ्यावी.

4.     कार्यालय व्यवस्थापनाने थर्मल स्कॅनर्स, हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत.

लग्नसमारंभकमाल 50 व्यक्तीअंत्यविधीकमाल 20 व्यक्तीसामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमकमाल 50 व्यक्तीशाळा आणि कॉलेज

कोचिंग क्लासेस

खाली दिलेल्या बाबी वगळता 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील.

1.     विविध शैक्षणिक बोर्डांकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवायचे उपक्रम.

2.     प्रशासकीय कामकाज आणि शिक्षकांनी अध्यापनाव्यतिरिक्त करायचे कामकाज.

3.     शालेय शिक्षण विभाग, कौशल्य आणि उद्योजकता विकास विभाग, तांत्रिक आणि उच्च शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग आणि अन्य वैधानिक प्राधिकरणांकडून  राबविण्यात येणारे किंवा परवानगी दिलेले उपक्रम.

4.     या निर्बंधांना अपवादाच्या स्थितीत हे विभाग आणि प्राधिकरणांना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागेल.

स्वीमिंग पूल, जिम, स्पा, वेलनेस सेंटर्स आणि ब्यूटी सलून्सबंद राहतील.हेअर कटींग सलून1.     50 टक्के क्षमता

2.     रोज रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहतील.

3.     एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्या आस्थापनांमध्ये इतर सुविधा बंद राहतील.

4.     हेअर कटींग सलून्सनी कोव्हिडरोधी वागणुकीचे काटेकोर पालन करावे तसेच केस कापणाऱ्या सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे.

खेळांच्या स्पर्धा1. आधीच जाहीर केलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खालील नियमांचे पालन करून सुरू राहतील

1. प्रेक्षकांना बंदी

2. सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी बायो-बबल

3. सहभागी होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडूंसाठी भारत सरकारचे नियम लागू राहतील.

4. सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी दर तीन दिवसांनी आरटीपीसीआर/आरएटी

2. शहर किंवा जिल्हा पातळीवर खेळांच्या शिबिरांना, स्पर्धांना, कार्यक्रमांच्या आयोजनाला बंदी.

एन्टरटेनमेंट पार्क, प्राणिसंग्रहालये, वस्तूसंग्रहालये, किल्ले आणि अन्य सशुल्क ठिकाणे/नागरीकांसाठीचे कार्यक्रमबंद राहतील.शॉपिंग मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्सेसमध्ये बंधनांसह प्रवेश1.     50 टक्के क्षमता. सर्व आगंतुकांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची आगंतुकांची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक.

2.     सर्व आगंतुक आणि कर्मचारी कोव्हिडरोधी वागणुकीचे तंतोतंत पालन करतील, याची दक्षता घेण्यासाठी आस्थापनांनी मार्शल्स नेमावेत.

3.     आरएटी चाचणीसाठी बूथ/किऑस्क

4.     फक्त लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी देण्यात येईल

5.     दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील.



रेस्टॉरंट्स, उपाहारगृहे

1.     50 टक्के क्षमता.

2.     सर्व आगंतुकांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची आगंतुकांची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक.

3.     फक्त लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी देण्यात येईल

4.     दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील.

5.     दररोज होम डिलीव्हरीला परवानगी राहील.

नाट्यगृह, सिनेमा थिएटर्स1.     50 टक्के क्षमता. सर्व आगंतुकांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची आगंतुकांची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक.

2.     फक्त लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी देण्यात येईल

3.     दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील.

आंतरराष्ट्रीय प्रवासभारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसारदेशांतर्गत प्रवासकोविडरोधी दोन लशी किंवा राज्यात प्रवेश करण्याआधी 72 तासांपूर्वीपर्यंत आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल ग्राह्य धरण्यात येईल. हे हवाई, रेल्वे आणि रस्ते या तिन्ही मार्गांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लागू राहील. प्रवास करणारे वाहनचालक, वहाक आणि अन्य सहयोगी कर्मचाऱ्यांनाही हे लागू राहील.कार्गो ट्रान्स्पोर्ट, औद्योगिक कामकाज, इमारतींचे बांधकामलसीकरण पूर्ण केलेल्या व्यक्तींकडून सुरू राहील.सार्वजनिक वाहतूकपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी, नियमित वेळांनुसारयुपीएससी, एमपीएससी, वैधानिक प्राधिकरणे, सार्वजनिक संस्था इ. द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा1.राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या परीक्षा भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पाडल्या जातील. अशा परीक्षांसाठीचे प्रवेशपत्र यासाठीच्या प्रवासाची अत्यावश्यकता सिद्ध करण्यास पुरेसे असेल.

2. राज्याच्या पातळीवर घेण्यात येणाऱ्या परीक्षा, ज्यांच्यासाठीची प्रवेशपत्रे आधीच निर्गमित झालेली आहेत किंवा ज्यांच्या तारखा आधीच निश्चित करण्यात आल्या आहेत त्या अधिसूचनेनुसार पार पडतील. अन्य सर्व परीक्षा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतरच पार पाडल्या जातील.

3. परीक्षांचे संचालन करताना कोव्हिडरोधी नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्यासाठी निरीक्षक नेमतील.

 

प्रवासासाठी अत्यावश्यक कारणेवैद्यकीय तातडीअत्यावश्यक सेवा (अत्यावश्यक सेवांची यादी परिशिष्ट 1 मध्ये दिल्यानुसार राहील.)विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक येथे जाणे किंवा येण्यासाठी वैध तिकीटासह24 तास सुरू राहणाऱ्या कार्यालयांसाठी, विविध शिफ्टमध्ये काम करण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांचा प्रवास अत्यावश्यक मानला जाईल.कोव्हिडरोधी वागणुकीसाठीचे नियम परिशिष्ट 2 मध्ये नमूद केल्यानुसार राहतील.दुकाने, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स तसेच ई-कॉमर्स किंवा होम डिलीव्हरी करणाऱ्या आस्थापनेतील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक राहील. यासाठी व्यवस्थापनाला जबाबदार धरण्यात येईल आणि यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता न केल्याचे आढळल्यास सदर आस्थापना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून बंद करण्यात येईल. या कामात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची नियमित वेळानंतर सदर आस्थापनेने आरएटी चाचणी करून घेणे गरजेचे आहे.कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये स्वतंत्रपणे वाढीव बंधनेही लागू करता येऊ शकतील.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या बंधनांमध्ये बदल करण्याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सुचवू शकेल. असे बदल राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीनेच लागू करण्यात येतील.कोव्हिड व्यवस्थापनाच्या कामासाठी राज्य सरकारची कार्यालये, किंवा राज्य सरकारद्वारे अर्थसहाय्यित अन्य संस्थांचे कर्मचारी आणि संसाधने यांची मागणी करण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला राहतील.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...