- महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा संतोष मंडलेचा - TheAnchor

Breaking

August 5, 2020

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा संतोष मंडलेचा

नाशिक|महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरच्या  घटनेनुसार दर दोन वर्षांनी कार्यकारीणी मंडळ आणि दरवर्षी  चेंबरचे अध्यक्ष आणि वरीष्ठ उपाध्यक्ष यांची निवड करण्यात येते. ही निवड वर्ष संपल्यावर सहा महिन्यात करावी अशी तरतूद आहे. 
Santosh-mandlecha
संतोष मंडलेचा अध्यक्ष, एमएसीेसीआयए
यंदा वर्ष संपण्यापूर्वीच कोरोना महामारीविरूध्द लढा देण्यासाठी सरकारने टाळेबंदी जाहिर केली व ती आजही चालू आहे.  दरम्यान चेंबरमध्ये ऑनलाईन कामकाज सुरू करण्यात यश आले. अनेक सभा, परिसंवाद, कार्यशाळा वगैरे ऑनलाईन घेत चेंबरमध्ये व्यापार व उद्योग क्षेत्रातील रचनात्मक कार्य सुरू ठेवण्यात यश आले आहे.

कार्यकारिणी मंडळ व पदाधिकाऱ्यांची निवडणूक घेणे शक्य नव्हते परंतु कार्यकारिणी मंडळ व व्यवस्थापन समितीची ऑनलाईन पद्धतीने सभा घेण्यात आली. या सभेत प्रत्यक्ष निवडणुका न घेता आहे त्या पदाधिकार्यांस व कार्यकारिणी मंडळास एक वर्षाची मुदत वाढ देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यामुळे  श्री संतोष मंडलेचा यांची सलग चौथ्यांदा चेंबरचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. या आधी सर्वश्री बी. डी. गरवारे, लालचंद हिराचंद व अभयकुमार कासलीवाल यांनी स्वातंत्र्य काळात हा बहुमान प्राप्त केला होता. 

त्याच्यासोबत  वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. ललित गांधी,  उपाध्यक्ष श्री. अनिलकुमार लोढा,  उपाध्यक्ष श्री. उमेश दाशरथी,  उपाध्यक्ष श्री. गौतम ठाकूर, उपाध्यक्षा सौ. शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष श्री. रवींद्र माणगावे या पदाधिकाऱ्यांची एक वर्षासाठी फेरनिवड झाली आहे. श्री. संतोष मंडलेचा व पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे  व्यापार उद्योग क्षेत्रातून  स्वागत  व अभिनंदन करण्यात येत आहे.