Skip to main content

मराठा क्रांती मोर्चा समन्वयक ना.भुजबळ यांच्या भेटीला; मराठा आरक्षणाला माझा पूर्णपणे पाठींबा: छगन भुजबळ

नाशिक| महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे मराठा समाज बांधवाना मोठा दिलासा मिळाला. मात्र नुकताच मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे ही लढाई आता पूर्णपणे न्यायालयीन झाली आहे. त्यामुळे मी जरी ओबीसी नेता असलो तरी मराठा आरक्षणाला माझा पूर्णपणे पाठींबा असून माझा पक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वेसर्वा खासदार शरदचंद्रजी पवार साहेब आणि राज्यशासन यांचा देखील मराठा आरक्षणास  १०० टक्के पाठींबा असून राज्यशासनाच्या वतीने न्यायालयात हा लढा पूर्ण ताकदीने लढला जाईल. तसेच मराठा मोर्चा समन्वयकांवरील गुन्हे मागे घेणे, सारथी पूर्ण क्षमतेने सुरु करणे, मराठा मुलीसाठी वसतिगृह या सर्व मागण्या आपण शासन दरबारी मांडून त्या पूर्ण करू असे आश्वासन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांनी दिले.
Meeting-of-Maratha-Kranti-Morcha-Coordinator-andminister-Bhujbal-My-full-support-for-Maratha-reservation-Chhagan-Bhujbal

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार जयवंतराव जाधव, नाना महाले, सुनील बागुल, निवृत्ती अरिंगळे, रंजन ठाकरे, ज्येष्ठ नगरसेविका वत्सला खैरे, करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, शरद तुंगार, शिवा तेलंग, बंटी भागवत, आशिष हिरे, चेतन शेलार, शिवाजी मोरे, संदीप शितोळे, बाळा निगळ, नीलेश शेलार, निलेश मोरे, किरण पानकर, योगेश गांगुर्डे यांच्यासह मराठा मोर्चा समन्वयक उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपूर्वी कांद्याच्या प्रश्नावर शरदचंद्र पवार साहेब यांच्या समवेत दिल्लीत बैठक आयोजित केल्याने मी दिल्लीला जात असल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे समन्वयकांना कळविले होते. तसेच हा दौरा अचानकपणे रद्द झाल्याने पुन्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांना नियोजित सार्वजनिक कार्यक्रमांच्या नुसार चर्चा करून सकाळी १०.३० वाजता तसेच दुपारी १.३० वाजता भेटण्याची वेळ दिलेली होती. तसेच मोर्चेकऱ्यांची सर्व व्यवस्था करण्यात आलेली होती. मात्र भेटण्यासाठी कार्यालयात पोहचण्याच्या आधीच मोर्चा समन्वयकांनी माझ्या विरोधात प्रक्षोभक भाषणे व घोषणाबाजी करत तिथून काढता पाय घेतला. समन्वयकांना भेटायला वेळ दिलेली असतांना देखील समाजात द्वेष पसरविण्याचे काम केले. याचं तीव्र दु:ख होत असल्याचे ते म्हणाले.

ते म्हणाले की, हा सर्व प्रकार घडल्यानंतरही आपण मराठा मोर्चा समन्वयकांना भेटण्यासाठी तयार आहोत असे कळविले होते. त्यानुसार आपण आज आला त्याबद्दल मी आपला आभारी असल्याचे सांगत. कुठलाही मोर्चा करतांना त्या मोर्चाचे नेतृत्व करण्याची कुणाएका नेत्याची जबाबदारी असते. त्यामुळे हा मोर्चा पार पडत असतांना याठिकाणी होत असलेल्या चुकीच्या प्रकाराबद्दल मोर्चेकऱ्यांना समजाविण्याची कुठल्यातरी नेत्याची जबाबदारी होती ती पार पाडली गेली नाही. ते म्हणाले की, केंद्र सरकारने आपले आरक्षण ५० टक्क्यांहून ६० टक्क्यांवर नेत आरक्षणात १० टक्के वाढ केली. त्यावेळी मात्र स्थगिती मिळाली नाही. मात्र महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षण दिल्यानंतर  आरक्षणाला स्थगिती कशी काय मिळाली असा सवाल उपस्थित करत यामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज होती असे त्यांनी सांगीतले. ते म्हणाले की, मी मराठा आरक्षणाचा विरोधक नाही या आरक्षणाला आपला पूर्ण पाठिंबा असून आपण आजवर मंत्रीमंडळात तसेच माध्यमांसमोर आपली भूमिका खुल्या पद्धतीने मांडली आहे. मात्र तरी देखील केवळ छगन भुजबळ बद्दल आकस निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे हे योग्य नसल्याचे ते म्हणाले.

ते म्हणाले की, आजवर माझाकडे आलेल्या कुठल्याही व्यक्तीची जात, धर्म मी बघितली नाही तर त्याचे काम काय आहे ते करण्यास प्राधान्य दिले. ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, विलासराव देशमुख यांनी घेतला. त्यांनी आरक्षण दिलं याचा सर्वांचा विचार करावा.  ओबीसीला आरक्षण मिळालं तेव्हा ९ न्यायाधीशांच्या पुढे लढाई झाली तेव्हा आरक्षण मिळालं त्यामुळे ही लढाई इतकी सोपी नाही. आज आमदार मंत्र्यांशी लढाई राहिलेली नाही तर ही लढाई सुप्रीम कोर्टात असून ती लढाई आपण जिंकली पाहिजे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील. खासदार शरदचंद्र पवार साहेब हे यामध्ये विशेष लक्ष देत असून त्यांनी आपला पाठींबा देखील जाहीर केलेला आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जात असतांना तरी कुणाच्याही मनात द्वेष भावना नसावी. मराठा आरक्षणा संदर्भात आपण यापुढील काळातही लोकभावना शासनापर्यंत पोचवू असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पालकमंञी छगन भुजबळ यांच्याविषयी क्रांती मोर्चाच्या मनात कुठलाही आकस नाही. शुक्रवारी घडलेला प्रकार असमन्वयातून झालेल्या गैरसमजाचा परिणाम असला तरी दुर्दैवी होता याची जाणीव झाली आहे. जिल्ह्याचे पालक म्हणून भुजबळ साहेबांनी आमच्या भावना समजून घ्याव्यात असे मराठा क्रांती मोर्चाचे  राज्य समन्वयक करण गायकर यांनी स्पष्ट केले. तसेच जेष्ठ नेते सुनील बागुल यांनी नाशिक जिल्ह्याच्या विकासात छगन भुजबळ यांचे योगदान मोठे असल्याचे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...