Skip to main content

हिरे अँड सन्स कंपनीच्या भव्यदिव्य दालनाचा माजी मंत्री प्रशांतदादा हिरे यांच्या हस्ते शुभारंभ

नाशिक| पंचवटी मार्केट यार्ड येथील हिरे अँड सन्स कंपनीच्या भव्यदिव्य दालनाचे उद्घाटन माजी मंत्री समाजश्री डॉ प्रशांतदादा हिरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 
Former-Minister-Prashantdada-Hiray-inaugurated-the-hiray-and-Sons-shop
फोटो: संदीप पवार

कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी सन १९३७ मध्ये स्थापना केलेल्या हिरे अँड सन्स कंपनीच्या दालनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आदिवासी सेवा समितीच्या कोषाध्यक्ष सौ. स्मिताताई हिरे, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी खा. देविदास पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा आ डॉ अपूर्वभाऊ हिरे, मधुरा ट्रस्टच्या सरचिटणीस संपदादिदी हिरे, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे  सहसचिव डॉ व्ही एस मोरे, आदिवासी सेवा समितीचे सहसचिव राजेशजी शिंदे,युवा नेते दीपक भाऊ सोनवणे,पृथ्वीराज हिरे,नगरसेविका प्रियांका माने, मा नगरसेवक अमोल जाधव, माजी प्राचार्य डॉ हरिष आडके, प्राचार्य डॉ. सी जी दिघावकर,राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अनिताताई भामरे, रतन चावला,सुनील आहिरे,भिवा महाले लक्ष्मण वाघेरे,शंकर पाटील,रामदास  महाले,सुदाम निकम,बाळा निगळ, ऍड.जगदीश काजळे, निवृत्ती अरिंगळे,योगेश दिवे, शाम पाटील,दिलीप तुपे,धनंजय बुचडे, रमाकांत देसले, कैलास खैरनार,संजय मोरे,विजय बेंडकुळे, डॉ विश्वनाथ सोनवणे, श्रीराम हिरे, निवृत्ती अरिंगळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते मधुकर मौले, प्राचार्य डॉ मोतीराम देशमुख, जेष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...