Skip to main content

नाशिकचा आधारवड हरपला, मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

नाशिक|प्रतिनिधी|नाशिकचे वैभव बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी वनाधिपती माजी मंत्री विनायकदादा पाटील (८०) यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले. एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर नाशिक अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
Nashik-Aadharwad-lost-heartfelt-tributes-from-dignitaries

साहित्य, संस्कृती, सामाजिक, सहकार, उद्योग, वनशेती आदी क्षेत्रांची चांगली जाण असणारे तसेच महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणी म्हणून ते महाराष्ट्रभर परिचीत होते. नाशिकमधील सामान्य माणूस असो की त्या त्या क्षेत्रातील मोठी व्यक्ती मार्गदर्शनासाठी अशा सर्वांचाच राबता त्यांच्याकडे असे मदतीसाठी त्यांची दारं सदैव उघडी होती. प्रश्न कोणताही असो त्यांचेकडे गेल्यावर तो सुटलाच समजा, वनमंत्री म्हणून किंवा विविध संस्थांमध्ये काम करतांना आपल्या कार्यकुशलता ठसा त्यांनी उमटवला. नाशिकचे एक पितृतुल्य व्यक्तिमत्व होते, नाशिकचा आधारवड आपल्यात नाही यांची कल्पना करवत नाही, त्यांच्या जाण्याने नाशिकचे वैभव हरपल्याची भावना नाशिककरांमध्ये आहे. 

नाशिकचा आधारवड हरपला अशा शब्दात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 



ज्येष्ठ मार्गदर्शक, नाशिकचे दादा हरपले: ना. छगन भुजबळ



यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व कवीवर्य कुसुमाग्रज यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभला. तसेच शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबत त्यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम केलं.पवार साहेबांचे ते जीवाचे मित्र होते.नाशिकमध्ये सर्व पक्षांचे नेते त्यांचे मार्गदर्शन घेत असत.वनशेती हा त्यांचा अत्यंत आवडीचा आणि अभ्यासाचा विषय होता. त्यामुळे भारतातील सहकारी वनशेतीचे ते जनक ठरले. वनस्पतीच्या तेलापासून डिझेल या इंधनाची निर्मिती होऊ शकते त्या जेट्रोफा या वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर तंत्रशुद्ध शेती त्यांनी १९८६ मध्ये केली होती. या वनस्पतीपासून प्रायोगिक तत्वावर डिझेल निर्मिती करून त्यांनी तेव्हा जगाचे लक्ष वेधून घेतले होते. विनायकदादा पाटील यांना वनशेतीतील योगदानासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण आणि वनश्री तर भारत सरकारचा इंदिरा प्रियदर्शनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. फुड अँड अॅग्रीकल्चरल ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्सचा आऊटस्टँडिंग ट्री फार्मर ऑफ इंडिया तसेच जीनिव्हा येथील रोलेक्स अवॉर्डही त्यांनी पटकावला होता. हे पुरस्कार मिळवणारे ते पहिले व एकमेव भारतीय होते.यासह विविध पुरस्काराचे ते मानकरी ठरले होते.


ते म्हणाले की, विनायकदादा पाटील यांचा प्रवास थक्क करणारा होता. निफाड तालुक्यात कुंदेवाडीचे सरपंच म्हणून त्यांनी राजकारणात श्रीगणेशा केला. त्यानंतर निफाड तालुका पंचायत समिती सभापती, निफाडचे आमदार, विधान परिषद सदस्य अशी भरारी घेत त्यांनी राज्य मंत्रिमंडळात उद्योग, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व युवकसेवा अशा विविध खात्यांच्या मंत्रिपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. सहकार क्षेत्रातही त्यांचा दबदबा राहिला. सहकारी सोसायटीचे चेअरमन, नाशिक जिल्हा सहकारी भूविकास बँकेचे अध्यक्ष, निफाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राज्यमंत्रिपदाच्या दर्जासह त्यांनी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.


त्यांच्या निधनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या आणि आदराचे स्थान असलेल्या दादांना आपण कायमचे मुकलो आहोत. विनायकदादांच्या निधनाने पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून राज्यशासनाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो असो छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

देवद्यादेवपणघ्या उपक्रमाला अखेरची उपस्थिती :आकाश पगार


दरवर्षी प्रमाणे नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवातील अंनत चतुर्दशीला देखील देवद्यादेवपणघ्या उपक्रम राबविला होता. कोरोनाच्या संकटामुळे स्वयंसेवकांच्या सुरक्षिततेसाठी फेस शिल्ड, फेस मास्क दिले होते. या फेस शिल्डचे प्रकाशन विनायक दादांच्या हस्ते छोटेखानी कार्यक्रमात केले होते. दादांच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा शेवटचाच कार्यक्रम असावा.तरुणाईला देखील लाजवेल असा उत्साह असलेल्या दादांना भावपुर्ण श्रद्धांजली 
आकाश पगार, सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते एनसीपी, नाशिक.

राजकारणातला सभ्य गृहस्थ आणि नाशिकचे वैभव: हेमंत देसाई


जेव्हा समाजात पर्यावरणाची जाणीव जागृती नव्हती, अशा काळात पर्यावरणावर, झाडांवर मनापासून प्रेम करणारा माणूस ही विनायकदादा पाटील यांची खरी ओळख. अत्यंत सुसंस्कृत, साहित्य व कलाप्रेमी, रसिक माणूस. यशवंतरावांचे संस्कार लाभलेला राजकारणातला सभ्य गृहस्थ आणि नाशिकचे वैभव. त्यांचे अचानक निघून जाणे चटका लावून जाणारे आहे. 
हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार, लेखक



Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...