Skip to main content

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी घेतली खा.डॉ.भारती पवार यांचेकडून नाशिक जिल्ह्याची माहिती

नाशिक| केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे खा.डॉ.भारती पवार यांनी भेट घेतली प्रसंगी नाशिक जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेत विकास कामासंदर्भात माहिती घेतली. त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत पॅकेज बाबत सविस्तर चर्चा करत जिल्ह्यासह दिंडोरी लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने त्यांना बळकटी देण्यासाठी चांगली तरतूद केली आहे. कांदा असेल द्राक्ष असेल यासह आदी महत्त्वाच्या शेत पिकांची नितीन गडकरी यांनी खा.डॉ.भारती पवार यांचेशी सविस्तर चर्चा करून माहिती घेतली.
Union-Minister-Nitin-Gadkari-took-information-about-Nashik-district-from-MP-Dr-Bharti-Pawar


त्याचप्रमाणे नाशिक मधील खादी ग्रामोद्योग देखील उत्कृष्ट आहे. कृषी बिलाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असून यामुळे शेतकरी सक्षम होऊन त्याचा आर्थिक दर्जा सुधारण्यास मदत होणार असल्याचे देखील गडकरी यांनी खा.डॉ. भारती पवार यांचेशी चर्चे दरम्यान सांगितले. खा.डॉ.भारती पवार यांनी क्लस्टरला भेट दिली समवेत डॉ.सुभाष भामरे, खा.हेमंत गोडसे उपस्थित होते.