Skip to main content

चेन्नई, मुंबईसह 16 ठिकाणी प्राप्तिकर विभागाचे छापे

नवी दिल्ली| प्राप्तिकर विभागाने आयटी सेझ विकासकआयटी सेझचे माजी संचालक आणि चेन्नईतील स्टेनलेस-स्टीलचे प्रमुख पुरवठादार प्रकरणात 27 नोव्हेंबर रोजी छापे टाकले . चेन्नईमुंबईहैदराबाद आणि कुडलोर येथील 16 ठिकाणी  शोध मोहीम राबवण्यात आली.

Income-tax-raids-at-16-places-including-Chennai-Mumbai

माजी संचालक आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी गेल्या  3 वर्षात सुमारे  100 कोटी रुपयांची  बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे पुराव्यामध्ये निष्पन्न झाले आहे.  एका  निर्माणाधीन प्रकल्पात आयटी सेझ विकासकाने काम सुरु असल्याचे 160 कोटी रुपयांचे खोटे दावे सादर केल्याचेही तपासात समोर आले आहे.  या कंपनीने  सल्लागारांचे बनावट शुल्क म्हणून सुमारे  30 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाचा आणि  20 कोटी रुपयांच्या अस्वीकारार्ह व्याज शुल्काचाही   दावा केला होता.

या धाडीमध्ये आयटी सेझ विकासकाशी संबंधित काही समभाग  खरेदी व्यवहार उघडकीला आले. या संस्थेच्या समभागांची विक्री त्याच्या पूर्वीचे भागधारकरहिवासी आणि अनिवासी संस्था यांनी केली होतीज्यानी  2017-18 आर्थिक वर्षात मॉरीशस इथल्या मध्यस्थाद्वारे  2300 कोटी रुपयांची  गुंतवणूक केली होती मात्र या विक्री व्यवहारातून झालेला भांडवली नफा प्राप्तिकर विभागाकडे  जाहीर करण्यात आला नाही. दोन्ही भागधारकांकडील अघोषित भांडवली नफा निश्चित करण्यासाठी चौकशी सुरू आहे. रोख रकमेसह अन्य जमीन व्यवहार आणि अनिवार्य परिवर्तनीय रोख्यांशी संबंधित प्रकरणांचीही तपासणी केली जात आहे

स्टेनलेस-स्टील पुरवठादाराकडे  सापडलेल्या पुराव्यांवरून असे आढळून आले आहे की पुरवठादार गट  हिशेबी ,  बेहिशेबी आणि अंशतः हिशेबी असे विक्रीचे तीन व्यवहार करत आहे.  बेहिशेबी आणि अंशतः हिशेबी विक्रीचे प्रमाण दरवर्षी  एकूण विक्रीच्या 25% पेक्षा जास्त होते . तसेच त्यांनी  विविध ग्राहकांना सेल्स अकोमोडेशन बिले दिली आहेत आणि या व्यवहारांवर 10% पेक्षा जास्त कमिशन प्राप्त केले आहे. सध्या बेहिशेबी उत्पन्नाचे मूल्यांकन केले जात असून ते अंदाजे 100 कोटी रुपये आहे. वित्तपुरवठासावकारी कर्ज आणि गृहनिर्माण  विकासामध्ये हा गट सहभागी आहे.  या कंपनीने  केलेले  बेहिशेबी व्यवहार आणि तेथील  बेहिशेबी भांडवल / कर्जाचा ओघ  सुमारे  50 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. आतापर्यंतच्या धाडीत 450  कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी  उत्पन्न सापडले आहे.पुढील तपास सुरू आहे.

सोर्स: पीआयबी

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...