- राज्यात पर्यटन व्यवसाय सुरू करा: अभिजित भोसले आणि सम्राट सोनवणे यांची मागणी - TheAnchor

Breaking

November 1, 2020

राज्यात पर्यटन व्यवसाय सुरू करा: अभिजित भोसले आणि सम्राट सोनवणे यांची मागणी

नाशिक| कोविड काळात पर्यटन व्यवसायाला मोठा अर्थिक फटाका बसला. नियमांचे पालन करून पर्यटन व्यवसाय सुरू करता येईल का यांचा विचार सरकारने करावा अशी मागणी सद्धम्म होलिडेज टूर कंपनीचे संचालक अभिजित भोसले आणि सम्राट सोनवणे यांनी केली आहे.
कोरोना काळात पर्यटन व्यवसाय सुरू करण्याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सद्धम्म होलिडेज टूर कंपनीतर्फे राज्यभरातील सदस्यांची बैठक नाशिक येथे झाली. त्याप्रसंगी मागदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी शारीरिक अंतराचे  नियम पाळून झालेल्या बैठकीला सदस्यांकडून पर्यटनाशी संबंधित असलेल्या घोषवाक्याचा प्रचार करण्यात आला. याप्रसंगी संचालक अभिजीत भोसले, सम्राट सोनवणे, सिद्धांत भोसले, सागर वाघ, घनश्याम अहिरे, विक्रम दुनबळे, देवेंद्र भालेराव, कमल जाधव, संजीवनी वाघमारे, मीना हिरे, रसिका गांगुर्डे, पल्लवी पगारे आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, कोविड-१९ मुळे अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची पूर्वघडी बसण्यासाठी व्यवसाय, उद्योग सरकार हळूहळू सुरू करत आहे. याकाळात सर्वच स्तरावरील नागरिकांचे हाल बघायला मिळाले. पर्यटनक्षेत्र देखील याला अपवाद नाही. आमचा व्यवसाय देखील पर्यटन क्षेत्राशी निगडित असल्यामुळे या कोरोनाचा प्रचंड फटका आमच्यासहीत सर्व टूर्स कंपन्यांना बसला. आमच्या कंपनीमध्ये  सुमारे ४० ते ५० लोक काम करत असल्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागतंय..! 

पर्यटन क्षेत्र हे कोरोना काळात अतिशय संवेदनशील झालं आहे. राज्यांतर्गत आणि देशांतर्गत वाहतुकीला अजूनही सरसकट  परवानगी मिळाली नाही,  त्यामुळे पर्यटन व्यवसाय कोरोनाकाळ आणि त्यानंतर सर्व व्यवसाय सुरू करून परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच पर्यटनावर उदरनिर्वाह करणारे रिक्षा-टॅक्सी चालक,  हॉटेल व्यवसायिक तसेच प्रेक्षणीय स्थळांवर  अवलंबून असणारी दुकाने ,उपहारगृहे ,टूर गाईड्स यांसारखे  अनेक इतर व्यवसाय या महामारीच्या काळात आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत.. देशातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळांवर फिरल्यामुळे लोकांच्या विचारांची देवाणघेवाण झाली. वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक एकत्र जमल्याने ज्ञानाचे आदानप्रदान होते. यासर्व गोष्टी कोरोना काळात नाहीशा झाल्यात. यावर्षी आमच्या कंपनीने मार्चपर्यंत नऊ टूर्स आयोजित केल्या त्यानंतर कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पुढच्या सर्व टूर्स रद्द कराव्या लागल्या त्यामुळे कंपनीला प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले.अतिशय कमी काळात प्रचंड मेहनतीने आम्ही या क्षेत्रात प्रगती केली. मात्र या जागतिक संकटामुळे आमच्यासारखे अनेक जण हतबल झाले आहेत. तरीसुद्धा आम्ही या संकटाचा प्रचंड धैर्याने सामना करतोय. राज्यातले इतरही बरेच व्यावसायिक या व्यवसायावर अवलंबून आहेत त्यामुळे आम्ही या क्षेत्रातील सर्व सहकारी सरकार सोबत आहोत. 
महाराष्ट्र सरकारने नियम व अटी यांचा आराखडा तयार करून  पर्यटनक्षेत्र लवकरात लवकर सुरू करावे म्हणजे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल.सरकारने जिम , सलून तसेच मर्यादित प्रमाणात वाहतूक सुद्धा सुरू केली आहे, तर सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी पर्यटनक्षेत्र सुद्धा नियम आखून सुरू करावे, आम्ही सरकारी नियमांचे पालन करण्यास कटिबद्ध आहोत असे ही त्यांनी सांगितले.