नाशिक| माहे मे-जून २०२० महिन्यांच्या कारोना काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मंत्री ना. जयंतराव पाटील यांनी ऑनलाईन माध्यमातून पक्षाच्या कार्यपद्धती बाबत काही प्रश्न विचारून अभिप्राय मागविण्यात आलेले होते.
त्यात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते, नाशिकचे पालकमंत्री ना. छगनरावजी भुजबळ यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस नाशिक जिल्हाध्यक्षा सौ. प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वात नाशिक जिल्ह्याला संपूर्ण राज्यातून दुसऱ्या क्रमांकाचे एकूण ११९७३ इतके अभिप्राय सादर करण्यात आले होते, त्याचा गौरव म्हणून ८ दशके कृतज्ञेची या खा. शरद पवार साहेबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ. प्रेरणा बलकवडे यांचा खा. शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विविध नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
सदरच्या सन्मानासाठी नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी महिला पदाधिकारी व सर्व हितचिंतक सहकारी यांनी ही अभिप्राय नोंदवून नाशिक जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसची जी मान उंचावली ती खरच अभिमानास्पद आहे, आदरणीय पवार साहेबांनी महिलांना राजकारणात जे स्थान मिळवून दिले, त्यामुळेच आम्हा सर्व महिलांना समाजात मान उंचावणार काम करण श्यक्य होत आहे, असे मनोगत सौ. प्रेरणा बलकवडे यांनी व्यक्त केले. तसेच हा मिळालेला पुरस्कार हा संपूर्ण राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस नाशिकचा असून त्याबद्दल बलकवडे यांनी सर्व महिलांचे आभार देखील मानले.