नाशिक| राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र पगार यांची कन्या चि. सौ.कां. दिशा व श्री.विश्वास शिंदे यांचे सुपुत्र चि. प्रसाद यांचा शुभविवाह आज नाशिक येथे झाला. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून झालेल्या सोहळ्यास नेटकऱ्यांनी ऑनलाईन सहभाग घेत वधू- वरास आशिर्वाद दिले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ, या सोहळ्यास उपस्थित राहून ना.भुजबळ यांनी उभयंताना शुभशिर्वाद दिले व त्यांच्या भावी उज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी ही नव दांपत्यास शुभेच्छा दिल्या.
या विवाहप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यासह आ. भास्करराव जाधव, माजी खा. समीर भुजबळ, आ. दिलीप बनकर, आ. सरोज आहेर, आ. हिरामण खोसकर, आ. सुनील भुसारा, माजी आ. अनिल कदम, दीपिका संजय चव्हाण, पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, पोलिस आयुक्त दिपक पांडे, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष डाॅ.सयाजी गायकवाड, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे यांच्यासह राजकीय, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यावेळेस उपस्थित होते.