नाशिक| ग्रामपंचायत निवडणुकीत चांगल्या समन्वयामुळे महाविकास आघाडीला आघाडी मिळाली आहे, आता तरी विरोधांनी मुंगेरीलाल के हसीन सपने पाहणे सोडावे अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी आज येथे दिली.
![]() |
Photo:File |
एका खाजगी कार्यक्रमासाठी गृहमंत्री ना. अनिल देशमुख हे नाशिक दौऱ्यावर होते, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर पत्रकारांशी ते बोलत होते. महाराष्ट्रात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना असो महाविकास आघाडीला आघाडी मिळाली आहे. एक महिन्यापूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत नागपूरची जागा भाजपाला गमवावी लागली.५८ वर्षानंतर त्यांचा पराभव झाला.
आता ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होतील अशा ठिकाणी चित्र बदललेले असेल असे सांगून महाविकास आघाडीत समन्वयाने काम केले जात असून आता तरी विरोधकांनी मुंगेरिलाल के हसीन सपने पाहणे सोडावे असा टोला लगावला.