तीळ म्हणाला गुळाला,
प्रेम भावना वाढविण्या,
आपण दोघे गोळा होऊ,
मैत्री आपली घट्ट करु !
तीळ म्हणतो मित्र होऊ,
गुळ म्हणतो मित्र होऊ !!
तीळ म्हणाला गुळाला,
माझी तव्याची भाजणी,
तुझा कढई पाक,
मैत्रीचा घट्ट धागा गुंफू छान !
तीळ म्हणतो मित्र होऊ,
गुळ म्हणतो मित्र होऊ !!
तीळ म्हणाला गुळाला,
माझे प्रेम तुझे प्रेम,
गावरान तुपात घट्ट करु,
सुपाच्या साक्षीने एकनिष्ठ राहू !
तीळ म्हणतो मित्र होऊ,
गुळ म्हणतो मित्र होऊ !!
तीळ म्हणाला गुळाला,
माझी रुचकर चव,
तुझा गुळचट गोडवा,
जगाला सगळ्या वाटू छान !
तीळ म्हणतो मित्र होऊ,
गुळ म्हणतो मित्र होऊ !!
तीळ म्हणाला गुळाला,
मी कणभर, तू मणभर,
साथीनं त्यात गोडवा भरु !
तीळ म्हणतो मित्र होऊ,
गुळ म्हणतो मित्र होऊ !
आपण करु कष्ट,
मैत्री ठेऊ एकनिष्ठ,
मैत्रीचा संदेश जगाला देऊ !
तीळ म्हणतो मित्र होऊ,
गुळ म्हणतो मित्र होऊ !!
तीळ म्हणाला गुळाला,
झटकु अंतकरणाचा आळस,
करुया चांगल्या कामाचा कळस,
सत्कर्माचा संदेश जगाला देऊ !
तीळ म्हणतो मित्र होऊ,
गुळ म्हणतो मित्र होऊ !!
तीळ म्हणाला गुळाला,
मी तेलकट, तु गुळचट,
बंधन आपले बांधू घट्ट,
निधर्माचा संदेश जगाला देऊ !
तीळ म्हणतो मित्र होऊ,
गुळ म्हणतो मित्र होऊ !!
तीळ म्हणाला गुळाला,
तु हो शीख-मी होतो इसाई,
सर्वधर्म समभावाचा संदेश,
भारत देशाला देऊ !
तीळ म्हणतो मित्र होऊ,
गुळ म्हणतो मित्र होऊ !!
तीळ म्हणाला गुळाला,
तु हो हिंदु -मी होतो मुस्लीम,
मानव धर्मच श्रेष्ठतेचा संदेश,
साऱ्या जगाला देऊ !
तीळ म्हणतो मित्र होऊ,
गुळ म्हणतो मित्र होऊ !!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
कवी-जी.पी.खैरनार, नाशिक
९४२१५११७३७/ ७०८३२३४०२१