- नाशिकमार्गे मुबंई-दिल्ली जाणारी राजधानी एक्सप्रेस १९ जानेवारीपासून रोज धावणार - TheAnchor

Breaking

January 15, 2021

नाशिकमार्गे मुबंई-दिल्ली जाणारी राजधानी एक्सप्रेस १९ जानेवारीपासून रोज धावणार

नाशिक| नाशिकमार्गे मुंबई- दिल्ली जाणारी राजधानी एक्सप्रेस आता १९ जानेवारीपासून रोज धावणार आहे अशी माहिती खा. डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.
The-Rajdhani-Express-from-Mumbai-to-Delhi-via-Nashik-will-run-daily-from-January-19
फोटो:फाईल
नाशिक जिल्ह्यातील यात्रेकरूंची मुंबईहून दिल्लीला जाणारी मध्य रेल्वेची राजधानी एक्सप्रेस  ही रोज सुरू व्हावी म्हणून अनेक दिवसांची त्यांची मागणी होती .पहिल्यांदा राजधानी एक्सप्रेस आठवड्यातून दोनच वेळेस नासिकहून धावत होती.परंतु खा. डॉ. भारती पवार यांच्या विशेष प्रयत्नातून चार दिवस धावण्यास परवानगी मिळाली होती तरीही ही एक्सप्रेस आठवडाभर रोज धावावी म्हणून मागणी होती तेव्हा खा .डॉ. भारती पवारांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यां च्याकडे सातत्याने मागणी केली होती.

अखेर या प्रयत्नाला यश मिळाले असून आता नाशिकमार्गे मुंबईहून दिल्लीला जाणारी राजधानी एक्सप्रेस आता १९ जानेवारी पासून रोज धावणार आहे, त्यामुळे अनेक दिवसांची यात्रेकरूंची मागणी पूर्ण झाली असल्याचे खा डॉ भारती पवार यांनी सांगितले. तसेच ही रेल्वे  रोज सुरू केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, रेल्वे मंत्री पियुषजी गोयल यांचेही त्यांनी आभार मानले.