नाशिक| अखिल भारतीय पुरोगामी प्रसार माध्यमं पत्रकार संघाचे राज्यस्तरीय पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. संघाच्या स्थापने नंतरचा पहिलाच पुरस्कार सोहळा येत्या १३ जानेवारीस माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नाशिक येथे होणार आहे, अशी माहिती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत बापू पगारे व महासचिव विलास पाटील यांनी दिली.
हा पुरस्कार सोहळा दिनांक १३ जानेवारी बुधवार रोजी दुपारी ३: ३० वाजता प. सा. नाटयगृह येथे होणार आहे. यावेळी खा. हेमंत गोडसे , डॉ भारती पवार , महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, भाजप प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, मा. आ. डॉ अपूर्व हिरे,भाजप शहर अध्यक्ष गिरीष पालवे, शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, मनसे जिल्हा अध्यक्ष दिलीप दातीर, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे आदींची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
तसेच प्रमुख अतिथी म्हणून विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पांडेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, माहिती उपसंचालक रणजितसिंग राजपूत, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रत्ना रावखंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी.बी. भोसले, स्थायी समिती सभापती गणेश गीते, जेष्ठ उद्योजक अशोक कटारिया, माजी आ. बाळासाहेब सानप, भाजपा जेष्ठ नेते सुरेश बाबा पाटील, सायक्लीस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे,प्रवीण खाबिया, आरपीआयचे नेते किशोर घाटे, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे, दैनिक सकाळचे संपादक डॉ राहुल रनाळकर, दैनिक लोकमतचे संपादक किरण अग्रवाल, दैनिक भ्रमरचे संपादक चंदुलाल शहा, दैनिक दिव्यमराठीचे निवासी संपादक जयप्रकाश पवार, पुण्यनगरीचे निवासी संपादक किरण लोखंडे, दैनिक पुढारीचे निवासी संपादक प्रताप जाधव, दैनिक महानगरचे हेमंत भोसले, एनजीएनचे संपादक मिलिंद सजगुरे जयंत महाजन आदी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या पुरस्कार सोहळ्यास पत्रकार बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाचे पदाधिकारी प्रियदर्शन टांकसाळे , संदीप पवार, प्रमोद दंडगव्हाळ, नरेंद्र जोशी , संतोष गिरी , मतीन खान, समशाद पठाण, सागर गायकवाड, लक्ष्मण डोळस, सुनील वाघ, मनोहर पाटील, धर्मेंद्र पाटील, संतोष कांबळे आदींनी केले आहे.
यांचा होणार गौरव
पत्रकारदिना निमित्त होत असलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यस्थरीय पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यात हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे (व्यंगचित्रकार )जीवन गौरव पुरस्कार नागपूरचे जेष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांना तर दैनिक पुण्यनगरीचे दिवंगत संस्थापक संपादक मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांच्या समरणार्थ दिला जाणारा उत्कृष्ट लेखणी पुरस्कार दैनिक भ्रमरचे संस्थापक संपादक चंदुलाल शाह यांना प्रदान करण्यात येणार आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, आरोग्य, क्रीडा, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. यात पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नागपूरच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे , मधुरा ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक दायित्वातून स्त्री सक्षमीकरण आणि प्रिंटिंग क्षेत्रात अल्पवधीतच नावलौकिक मिळवणाऱ्या उदयनमुख उद्योजिका पार्श्वगायिका संपदा प्रशांत हिरे, बांधकाम क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विनोद शिंदे, उत्कृष्ट प्रशासक उपजिल्हाधिकारी डॉ.अर्चना केदार पठारे (औटी), उत्कृष्ट ग्रामप्रशासन शेखर शांताराम गोऱ्हे आदींचा गौरव केला जाणार आहे.त्याचबरोबर उत्कृष पत्रकारिता करणाऱ्या नामवंत पत्रकारांचा यथोचित सन्मान यावेळी होणार आहे.याचवेळी जिल्ह्यातील पत्रकांच्या मुलींना पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सायकलींचे वाटप केले जाणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात सुरुवातीला ११ सायकली दिल्या जाणार आहेत.
१) महाराष्ट्र टाइम्स - सुनील कुमावत, जितेंद्र तरटे
२) नवराष्ट्र - बाबासाहेब पवार
३) आपलं महानगर - प्रसाद गवळी , दीपक निकम , मनीष कटारिया
४) लोकमंथन - चंद्रकांत जोशी
५) देशदूत - श्रीकांत रौदळ , निशिकांत पाटील , कुंदन राजपूत भारत पगारे
६) पुण्य नगरी - विकास शेंडगे , योगेश गांगुर्डे , सुनील सं. घुमरे , विकास गामणे
७) लोकमत - वसंत तिवरे , शाम खैरनार,निलेश तांबे
८) दिव्य मराठी - राजेंद्र देशपांडे , मनोज घोणे
९) पुढारी - राहुल पगारे , गौरव आहिरे,हेमंत घोरपडे
१०) सकाळ - योगेश मोरे
१०) गावकरी - सुरेश भोर, संदीप दूनबळे ,संतोष कांदे
११) दिनकर - नितीन जोशी
१२) बाळकडू - सतीश परदेशी
१३) हमारा महानगर - चंद्रशेखर गोसावी
१४) क्राईम - देवानंद बैरागी
१५) भ्रमर- तृप्ती शुक्ल
१६) जिल्हा माहिती कार्यालय - वैभव कातकाढे
१७) सक्षम पोलीस टाइम्स - ज्योती रामोळे
१८) तिरंगा - सुरेश निकुंभ
१९) लोकज्योती - जितेंद्र येवले
२०) नाशिकनामा - नितीन सुगंधी
२१) न्यूज मसाला - नरेंद्र पाटील
२२) सन्मान न्यूज - रवींद्र एरंडे
२३) न्यूज १८ लोकमत - प्रशांत बाग
२४) ए . एन . आय.- सतीश रुपवते
२५)झी २४ तास - सोनू भिडे
२६) जागर जनस्थान - समीर चव्हाण
२७) एन.सी.एन - रोहन दाणी
२८) जनमत वुत्तवाहिनी - आर आर पाटील. २९) संजय परदेशी ३०) किरण नाईक लोकशाही न्युज ३१) समशुद्दीन कादर पटेल ३२)साजिद शेख