नाशिक|बर्डफ्ल्यू आजाराबद्दल भिती नको पण सतर्कता बाळगत काळजी ही घ्यायलाच हवी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
अर्धवट शिजलेले मांस/चिकन किंवा अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका तसेच आजारी दिसणा-या सुस्त पडलेल्या पक्षाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. तसेच पुर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस ही एकत्र ठेवू नका. असे सांगितले असून सोशल माध्यमातून ही नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जनजागृतीवर भर दिला आहे.