- शिंदे टोलनाका येथील असुविधा दूर करा: ट्रान्सपोर्ट असोसिएशन - TheAnchor

Breaking

January 13, 2021

शिंदे टोलनाका येथील असुविधा दूर करा: ट्रान्सपोर्ट असोसिएशन

नाशिक| नाशिक पुणे हायवेवरील शिंदे टोल नाका येथील असुविधा दूर करा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नाशिक ट्रान्सपोर्ट संघटनांकडून देण्यात आला आहे. याबाबत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन अध्यक्ष पी.एम.सैनी यांच्यावतीने  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पांडेय, टोल व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले आहे.
Take-away-the-inconvenience-of-Shinde-Tolnaka-Transport-Association
फोटो:फाईल
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक पुणे रोडवर असलेल्या शिंदे टोल नाका येथील असुविधांबाबत बाबत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन व नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोशीएशनच्या वतीने यापूर्वी देखील निवेदन दिले आहे. येथील टोल प्रशासनाची असलेली मुजोरीची वागणूक यामुळे वाहतूकदार त्रस्त झाले आहे. वाहतूकदार याठिकाणाहून प्रवास करत असतांना टोल नाक्यावर फास्ट टॅग मधील तांत्रिक अडचणी असल्याने येथील व्यवस्थेत असलेले कर्मचारी व त्यांचे काही वरिष्ठ गाडीचे परमिट,मालाचे पेपर,लायसन घेता आणि ड्रायव्हरला दमबाजी करता या बद्दल काही विचारले तर टोल व्यवस्थापनने आम्हाला सांगितले आहे असे उत्तर देता. असा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत विचारणा करण्यास गेल्यानंतर येथील प्रशासनाकडून दादागिरीची भाषा केली जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वी येथील कर्मचाऱ्यांकडून चालकांना मारहाण केल्याचे प्रकार देखील घडलेले असल्याचे म्हटले आहे.
Take-away-the-inconvenience-of-Shinde-Tolnaka-Transport-Association
त्यांनी म्हटले आहे की, नाशिक पुणे हायवेवर असलेल्या या शिंदे टोल प्लाझा येथे स्वछता गृहांची देखील गैरसोय आहे. चालकांना थांबण्यासाठी तसेच फ्रेश होण्याची कुठलीही व्यवस्था नाही. त्याचबरोबर टोल जवळ असलेल्या स्वच्छता गृहांची दयनीय अवस्था झालेली आहे. तसेच येथे रुग्णवाहिकेची देखील याठिकाणी सोय नाही.नाशिक ते सिन्नर दरम्यान मोह गावाजवळ रस्त्यात नेहमी खड्डे असता त्या मुळे अपघातही होत असता. शासनाने ठरवून दिलेल्या नियमावली पायदळी तुडविण्याचे काम या टोल प्रशासनाकडून होत आहे. याठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेली लाईटची व्यवस्था पूर्णपणे बंद असून अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. येथील विविध प्रश्नांबाबत टोल प्रशासनाशी संपर्क केल्यानंतर दादागिरीची भाषा केली जात आहे. यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील टोल प्रशासनाला याबाबत आदेश देण्यात येऊन येथील प्रश्न मार्गी लावण्यात यावे. अन्यथा वाहतूकदार संघटनाना येथे आंदोलनाशिवाय पर्याय राहिलला असा इशारा त्यांनी निवेदनात दिलेला आहे.